Support for the self-employed trainees | स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणार्थ्यांना आधार
स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणार्थ्यांना आधार

ठळक मुद्देलाभार्थी आनंदी : पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सुक्ष्म गुंतवणूक निधीअंतर्गत ग्राम संघाना चांदा क्लबवर आयोजित कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप शुक्रवारी करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
त्यामध्ये जनकल्याण ग्रामसेवा संघ, जिजाऊ ग्रामसेवा संघ, भाग्यलक्ष्मी ग्रामसेवा संघ, साईबाबा ग्रामसेवा संघ व सावित्रीबाई फुले ग्रामसेवा संघ या ग्रामसेवा संघाना एनआरएलएमअंतर्गत वाटप करण्यात आले. जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील निर्मल स्वयंसहायता समूह, ओमसाई व शेवंती स्वयंसहायता समूह या समूहांना इंडियन बँकेकडून धनादेश वितरीत करण्यात आले.
१ एप्रिल २०१८ ते १ जानेवारी २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व बँकांनी चार हजार ४४१ गटांना ४० कोटी ७० लाख ८१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करून राज्यात सर्वात जास्त कर्ज वाटप करणारा जिल्हा असे नाव लौकिक केले आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश गटातील सेंद्रीय शेती करणारे शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक करण्याकरिता वाहन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात आला. यामध्ये कोरपना तालुक्यातील पकडीगुडम सेंद्रीय शेती गट धानोलीचे लाभार्थी लिंगा वेट्टी यांना ७७० किलो वाहक क्षमता असणारे वाहन खरेदीसाठी बँकेतर्फे चार लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील सेंद्रीय भात उत्पादक गट किन्ही येथील लाभार्थी शंकर अर्जुन गव्हारे यालासुद्धा कर्ज देण्यात आले.
प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण
एनआरएलएमअंतर्गत दिनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेमार्फत चिमूर तालुक्यातील निखील श्रीकृष्ण शामकुळे, संदीप पुरूषोत्तम लोखंडे, पंकज शामराव शेंडे व दर्शना दयाराम मून या प्रशिक्षण पूर्ण करणाºया प्रशिक्षणर्थ्यांना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. एनआरएलएमअंतर्गत दिनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेमार्फत चिमूर तालुक्यातील निखील श्रीकृष्ण शामकुळे, संदीप पुरूषोत्तम लोखंडे, पंकज शामराव शेंडे व दर्शना दयाराम मून या प्रशिक्षण पूर्ण करणाºया प्रशिक्षणर्थ्यांना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.


Web Title: Support for the self-employed trainees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.