‘सूर रायझिंग स्टार’ मधून चमकले उद्याचे ‘सुपरस्टार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:00 AM2018-01-19T00:00:02+5:302018-01-19T00:00:12+5:30

आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठाच न मिळाल्यामुळे अनेक अस्सल कलावंत समाजासमोर येत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्तगुणांना वाव देऊन ....

 'Superstar Raising Star' shines tomorrow with 'superstar' | ‘सूर रायझिंग स्टार’ मधून चमकले उद्याचे ‘सुपरस्टार’

‘सूर रायझिंग स्टार’ मधून चमकले उद्याचे ‘सुपरस्टार’

Next
ठळक मुद्देकलर्स- लोकमत समूह उपक्रम : बहारदार सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध, लकी ड्रॉ मध्ये प्रेक्षकांनी पारितोषिक जिंकले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठाच न मिळाल्यामुळे अनेक अस्सल कलावंत समाजासमोर येत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्या कलाकौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी लोकमत समूह नेहमीच आघाडीवर असतो. विविध कार्यक्रम, स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या उद्याच्या सुपरस्टार्सना प्रकाश झोतात आणले जाते.
सुरांचे देणे लाभलेल्या प्रतिभावान गायकांना एक नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकमत आणि कलर्स वाहिनी आगळे-वेगळे व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहे. ‘सूर रायझिंग स्टार’ चे असे त्याचे नाव कलर्स व लोकमतद्वारे आयोजित ही गायन स्पर्धा स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात पार पडली. यामध्ये चार वर्षांपुढील मुले-मुली, स्त्री-पुरुष आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, रमण बोथरा, आनंद नागरी सहकारी बँकेचे संचालक जितेंद्र चोरडीया, गोंडपिपरीचे तहसीलदार येरणे, बंटीभाई चोरडीया, राजेश चोरडिया, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, चंद्रपूर लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले उपस्थित होते. परिक्षक म्हणून भारती कदम, प्रफुल्ल कदम, प्रशांत डेहनकर, मुकेश कुमार, जित बिस्वास यांनी काम पाहिले.
कार्यक्रमात अनेक स्पर्धकांनी विविध प्रकारची गाणी सादर केली. प्राथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेकांनी आपल्या गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये तारे बाराती... लगना लगे, नैना ठग लेंगे, उगवती शुक्राची चांदणी, गारवा आदी गाण्यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे या प्रयत्नांना साथ मिळाली आहे ती कलर्स वाहिनीची. मनोजरंनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करुन छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घरांंमध्ये कलर्सने बोलबाला निर्माण केला आहे. निखळ कौटुंबिक व संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत सामाजिक बांधिलकीचेही अनेक उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमात उपस्थितांसाठी लक्की ड्रॉ काढण्यात आली. संचालन अमोल कडूकर यांनी केले. सोनम मडावी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऐश्वर्या खोब्रागडे, नेहा तांबस्कर, सचिन मडावी आदींनी सहकार्य केले.

रायझिंग स्टारच्या निमित्ताने कलर्स वाहिनी घेऊन येत आहे. भारतातील पहिल्या लाईव्ह रिअ‍ॅलिटी शोचे दुसरे पर्व, ज्याद्वारे मोडल्या जाणार विचाराच्या चौकटी. भाषा, जात, आर्थिक स्थिती, धर्म अशा विविध चौकटीची आज काहीही गरज नाही. अशा चौकटीचे बंधने झुगारुन आपले टॅलेंट जगासमोर आणणाºया गायकांना चौकटी मोडण्यास मदत म्हणून या शोच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपºयातून लाईव्ह व्होटिंग करु शकतात. यामध्ये साथीला आहेत देशातील तीन सुप्रसिद्ध महारथी परिक्षक गायक व संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर आणि अभिनेता व गायक दिलजित दोसांज. परंतु खरे परीक्षक तर कलर्स वाहिनी पाहणारे देशातील १३० कोटी भारतीयच असणार आहेत. तर मग या सिझनमध्ये केवळविचारांच्या चौकटीच नाही मोडल्या जाणार तर देशातील प्रतिभावान गायकांचे नशीबही बदलणार आहे. कलर्स वाहिनीवर २० जानेवारीपासून दर शनिवार- रविवारी रात्री ९ वाजता सुरु होत आहे देशातील एकमेव लाईव्ह सिगिंग रिअ‍ॅलिटी शो रायझिंग स्टार...

रायसिंग स्टार विजेते
प्रथम- विजय पारखी
द्वितीय- प्रणाली पाटील
तृतीय- आदित्य शिंदेकर
प्रोत्साहनपर- पूजा पारखी, ऐश्वर्या सातपुते, आशिष मेश्राम, आयुष झाडे, निकिता गोवर्धन, स्नेहल लहाने, सावी चहांदे.

Web Title:  'Superstar Raising Star' shines tomorrow with 'superstar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.