तलावांची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:58 PM2019-03-17T22:58:13+5:302019-03-17T22:59:47+5:30

मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन समजले जाते. मात्र हेच सुरक्षित सिंचन आता धोक्यात आले आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जलाशयात पाणी साठू शकले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. मात्र या तलावातील जलसाठ्याची स्थिती आतापासून चिंताजनक आहे. सरासरी केवळ २८.६१ टक्क्यापर्यंत जलसाठा या तलावात शिल्लक आहे. त्यामुळे यंदाचा हा उन्हाळ भिषण पाणी टंचाईचा जाणार आहे.

The status of the ponds is worrisome | तलावांची स्थिती चिंताजनक

तलावांची स्थिती चिंताजनक

Next
ठळक मुद्देजलसाठा २८ टक्क्यांवर : सुरक्षित सिंचन धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन समजले जाते. मात्र हेच सुरक्षित सिंचन आता धोक्यात आले आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जलाशयात पाणी साठू शकले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. मात्र या तलावातील जलसाठ्याची स्थिती आतापासून चिंताजनक आहे. सरासरी केवळ २८.६१ टक्क्यापर्यंत जलसाठा या तलावात शिल्लक आहे. त्यामुळे यंदाचा हा उन्हाळ भिषण पाणी टंचाईचा जाणार आहे.
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. गतवर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्याला दिलासा मिळाला. मात्र तोही क्षणिक ठरला. आता रबी हंगामही संपला आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.
यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत पाणी चांगल्या प्रकारे मुरु शकले नाही. सिंचन प्रकल्प, तलाव, बोड्या यात पाणी साठू शकले नाही. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे. सरासरी २८.६१ टक्केच पाणी या तलावांमध्ये शिल्लक आहे.
२९ तलावात ठणठणाट
जिल्ह्यात जलसाठ्याची स्थिती भयावह दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या पंधरवाड्यातच जिल्ह्यातील तब्बल २९ तलाव कोरडे पडले आहेत. या तलावात शून्य जलसाठा आहे. यामध्ये चिंधी, कुसर्ला, अड्याळ मेंढा, गोलाभुज, मांगली, देवई, धाबा, धामणगाव, शेगाव खुर्द, खोलदोडा, मुरझा, भसबोरन, अंतरगाव, तांबेगडी मेंढा, पाथरी, सायमारा, वलनी, अड्याळ, कोसंबी, गोलाभूज, राजोली, चिरोली, कोळसा, करंजी, भटाळा, कारगट्टा, मोटेगाव, अडेगाव व काजळसर या तलावांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ९७ मामा तलाव
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ३८.२८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३७.५९ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ १२.३८ टक्के पाणी शिल्लक आहे.

Web Title: The status of the ponds is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.