ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मचाण पर्यटनाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:40 AM2018-12-03T11:40:50+5:302018-12-03T11:42:35+5:30

पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ताडोबा प्रशासनाने बफर झोन क्षेत्रातील आगरझरी आणि देवाडा वनक्षेत्रात ३० नोव्हेंबरपासून मचाण पर्यटनला सुरू करण्यात आली आहे.

Starting of Machan Tourism in Tadoba Tiger Project | ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मचाण पर्यटनाला सुरूवात

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मचाण पर्यटनाला सुरूवात

googlenewsNext
ठळक मुद्देनिसर्ग सौंदर्य अनुभवण्याची संधी शुभारंभाप्रसंगी झाला पर्यटकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हमखास व्याघ्र दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रात ३० नोव्हेंबरपासून प्रथमच मचाण पर्यटनाला सुरूवात झाली आहे. यामुळे पर्यटकांना व्याघ्रदर्शनासह ताडोबातील नैसर्गिक सौंदर्य जवळून अनुभवता येणार आहे. या नाविन्यपूर्ण पर्यटनाचा उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी लाभ घेणाऱ्या पुण्यातील तीन पर्यटकांचा वन विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हमखास व्याघ दर्शनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटक ताडोबात व्याघ्र दर्शनासाठी येतात. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ताडोबा प्रशासनाने बफर झोन क्षेत्रातील आगरझरी आणि देवाडा वनक्षेत्रात ३० नोव्हेंबरपासून मचाण पर्यटनला सुरू करण्यात आली आहे. या मचाण पर्यटनामध्ये सर्वप्रथम जिप्सीमधून फेरफटका मारून आणल्यानंतर मचाणावर सोडण्यात येणार आहे. पर्यटनाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील मंदार नायडू, श्रीनिवास नायडू यांनी आगरझरी वन परिसरातील मचाणावरून तर देवाडा येथील मचाणावर पर्यटक फिदा निरखवाला यांनी ताडोबातील व्याघ्रदर्शन व सौंदर्याचा आनंद लुटला. मचाण पर्यटनाचा प्रथमच लाभ घेणाºया या पर्यटकांचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मचाण पर्यटन कसे कराल?
पर्यटनाच्या दोन दिवसांआधीच ताडोबा क्षेत्रसंचालक कार्यालयात नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर पर्यटकांना हमीपत्र तसेच बंधपत्र भरू न द्यावा लागणार आहे. मचाणावर टाकण्यासाठी चटई, चादर व बेडशिटची व्यवस्था पर्यटकांना स्वत:च करावी लागेल. जेवण, पाणी, औषधी व इतर सामुग्रीची जबाबदारी पर्यटकांवरच राहील. एका मचाणावर फक्त दोनच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

-अन्यथा पर्यटकांना दंड
पर्यटकांना नियोजित वेळेआधी मचाणावरून खाली उतरण्यास मनाई करण्यात आली. खाली उतरल्याचे आढळल्यास कारवाई करून दंड ठोठावण्यात येणार आहे. पर्यटकांनी डोक्याला सुंगधित तेल व अत्तर लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला. प्लास्टिक व अन्य वस्तू मचाणावर नेता येणार नाही. मचाण पर्यटन यशस्वी झाल्यानंतर हा प्रयोग ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अन्य स्थळांवरूनही सुरू केल्या जाणार आहे.

Web Title: Starting of Machan Tourism in Tadoba Tiger Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.