सोयाबीन पिकले एकरी साडेतीन क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:24 PM2017-11-28T23:24:45+5:302017-11-28T23:25:48+5:30

यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची हेक्टरी उत्पादकता किती राहणार, याचे विश्लेषण करण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील धान उत्पादक तालुक्यांना वगळून ११ तालुक्यांत २२८ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन केले होते.

Soyabean picale acre three and a half quintals | सोयाबीन पिकले एकरी साडेतीन क्विंटल

सोयाबीन पिकले एकरी साडेतीन क्विंटल

Next
ठळक मुद्दे२१७ पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष : पोंभुर्ण्यातील उत्पादनात घट, जिवती तालुक्यात वाढ

राजेश मडावी।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची हेक्टरी उत्पादकता किती राहणार, याचे विश्लेषण करण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील धान उत्पादक तालुक्यांना वगळून ११ तालुक्यांत २२८ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन केले होते. यातील २१७ प्रयोगांचे निष्कर्ष जाहीर झाले असून सोयाबीनचे एकरी उत्पादन सुमारे साडेतीन क्विंटल इतके झाले आहे. मागील वर्षाची तुलना केल्यास यंदा चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, कोरपना आणि जिवती तालुक्यातील सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादनात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, लागवडीचा खर्च लक्षात घेता हे उत्पादन पुरेसे नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक दुर्दशा संपण्याची कदापि शक्यता नाही.
राज्य शासनाने मागील वर्षी तूर डाळ खरेदी संदर्भात शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याने दरात मोठी घसरण झाली होती. तूर डाळ आयात करण्याची वेळ येऊ नये, याकरिता शेतकºयांना तुरीचे लागवड करण्यास कृषी विभागाकडून विशेष प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यामुळे विक्रमी उत्पादन झाले. मात्र, खरेदीच्या धोरणात शासनाने आपटी खाल्ली. त्याचा अनिष्ठ परिणाम तूर उत्पादक शेतकºयांवर झाला होता. सोयाबीन या तेलवर्गीय पिकाच्या दराबाबतही स्पष्टता नसल्याने जिल्ह्यातील लागवड क्षेत्र वाढणार नाही, असा अंदाज होता. पण, आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या शेतकºयांनी कापसासोबतच यावेळी सोयाबीन लागवडीलाही प्राधान्य दिले. परिणामी, चंद्रपूर, राजूरा, गोंडपिपरी, जिवती, मुल, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, कोरपना, चिमूर, पोंभुर्णा आदी ११ तालुक्यांतील लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली.
या तालुक्यांतील सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन काढण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने २२८ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले होते. यातील २१७ प्रयोगांचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. या निष्कार्षानुसार सरासरी हेक्टर उत्पादन साडेतीन क्विंटलच्या पुढे सरकू शकले नाही.
पावसाची अनियमिता आणि वेगवेगळ्या कीडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन लागवडीचा खर्च वाढून शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे सरकारी हमीभावाची खात्री नसल्याच्या पार्श्वभूमीवर हेक्टरी उत्पादन कमी झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक दुष्टचक्रातून सुटका होण्याची शक्यताच मावळली आहे.
कापसाचे २५२ पीक कापणी प्रयोग
जिल्ह्यातील कापसाची हेक्टरी उत्पादकता सिद्ध करण्यासाठी कृषी विभागाने २५२ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन केले आहे. कृषितज्ज्ञांनी निश्चित केलेले आधुनिक तंत्रशुद्ध निकष व मान्यताप्राप्त पद्धतीनुसार हे प्रयोग येत्या काही दिवसांत होणार आहेत. नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर हेक्टरी उत्पादन जाहीर होईल.
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सतत हुलकावणी दिली. सोयाबीन उत्पादनाच्या दृष्टीने पुरेसा पाऊसच पडला नाही. पावसाने वारंवार दीर्घ खंड दिल्याने पिकांवर किडरोगांनी हल्ला केला. दरम्यान प्रतिबंधात्मक औषधींंची फ वारणी केल्याने एकूणच लागवडीचे खर्च वाढले. आता हाती आलेल्या उत्पादनाचा विचार केल्यास खर्च कसा भरून काढायचा, या प्रश्नाने सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

Web Title: Soyabean picale acre three and a half quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.