चंद्रपुरात तापमान ४८चा आकडाही पार करणार! शनिवारी होते जगात सर्वाधिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 03:11 PM2018-05-21T15:11:58+5:302018-05-21T15:13:34+5:30

फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातली हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्र दृष्टी वळली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान ४७ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे.

Signs that this temperature will touch 48 in Chandrapur this year | चंद्रपुरात तापमान ४८चा आकडाही पार करणार! शनिवारी होते जगात सर्वाधिक!

चंद्रपुरात तापमान ४८चा आकडाही पार करणार! शनिवारी होते जगात सर्वाधिक!

Next
ठळक मुद्देपशू-पक्षी बाहेर पडेनासे झालेरात्री ११-१२ पर्यंत जाणवतात उष्णतेच्या झळानवतपाची नागरिकांमध्ये धास्ती

चंद्रपूर: फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातली हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्रदृष्टी वळली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान ४७ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे. शनिवारी ४७.८ वर तापमान पोहचले तेव्हा ते जगातील सर्वाधिक होते अशी माहिती अल डोरॅडो या जगभरातील तापमानाची नोंद ठेवणाऱ्या संस्थेने दिली आहे. आज चंद्रपूरचे तापमान ४४, ब्रह्मपुरीचे ४४.६ वर घसरल्याने काहीसा दिलासा मिळाला.  मात्र, २५ तारखेपासून सुरू होणाऱ्या नवतपा या नऊ दिवसांच्या कालावधीत हा आकडा ४८ अंश सेल्सिअसची पातळी गाठेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो आहे.

या पट्ट्यातील तापमान उन्हाळ्यात तसे नेहमी जास्तच असते.  मे महिन्याच्या प्रारंभी वादळी पावसाने हजेरी लावल्यानंतर थोडा गारवा निर्माण झाला. मात्र तो एक प्रकारचा चकवाच ठरला.

शनिवारचे तापमान जगात सर्वाधिक

त्यानंतर तापमानाने अशी उसळी घेतली की १७ मे रोजी आजवरचे सर्व आकडे मोडीत काढत ४७. ६ चा आकडा पार केला होता. त्यानंतर अल डोरॅडोच्या माहितीनुसार १९मे रोजी चंद्रपुरातील तापमान जगभरात सर्वात जास्त ४७.८ होते. तर ब्रह्मपुरीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ४७.१,  नागपूर ४६.२ तापमानासह जगात तिसऱ्या क्रमांकाचे तापमान असलेले शहर ठरले होते. वर्ध्याचे ४५.६ तापमान जगातील सहाव्या क्रमांकाचे होते. 

२००७मध्ये होते ४९

अर्थात तापमानाचे हे आकडे भलतेच तापवणारे वाटत असले तरी याधीही चंद्रपुरात २ जून २००७ रोजी ४९ अंश सेल्सिअस हा तापमानाचा उच्चांक नोंदविला गेला आहे. त्याआधी २ मे २००४ रोजी ४७.३ तर ३१ मे २०१३ रोजी ४८.२ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदविले गेले आहे.

तप्त उन्हामुळे जलस्रोत आटले
जसजशे उन्ह तापू लागले आहे, तसे जलाशय, नदी, तलाव-बोड्यातील पाणी आटू लागले आहे. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटत चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. चंद्रपुरातील घरगुती विहिरींनीही तळ गाठला आहे.

सरपटणारे प्राणी, पक्षी दिसेना !
मागील तीन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. पारा सातत्याने वाढत आहे. येणाºया काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत. या वाढत्या तापमानामुळे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांनाही धोका निर्माण झाला आहे. एरवी शहरात ठिकठिकाणी दिसणारे पक्षी आता फार कमी दिसत आहे. सरपटणाºया प्राणी थोडाफार गारवा असेल त्या ठिकाणी दडी मारली आहे. त्यामुळे तेदेखील दिसून येत नाही.


काळजी घेणे गरजेचे
सध्या चंद्रपुरात उष्णतेची लाट सुरू आहे. या वाढत्या तापमानात नागरिकांनी विशेषत: वृध्द व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल कपडे घालावे, थंड वातावरणात रहावे, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात काम करणे टाळावे, अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे उष्माघाताची असून असे आढळल्यास थंडगार पाण्याने आंघोळ करावी, थंड जागेत आराम करावा, भरपूर थंड पाणी प्यावे किंवा लिंबू पाणी, आंब्याचे पन्हे प्यावे, परिश्रमाचे काम करू नये, रुग्णालयात उपचार करून घ्यावा.

Web Title: Signs that this temperature will touch 48 in Chandrapur this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.