ठळक मुद्देशेतकºयांचा सहभाग : मोबदल्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : उच्चतम दाबाच्या वाहिनीचा वापर हा वाणिज्य दृष्टीकोनाने होत असल्यामुळे कॉरिडोअरमध्ये येत असलेल्या संपूर्ण जागेचा दर हा अकृषक वाणिज्य दराने देण्यात यावा, करारनाम्यानंतरच टॉवरच्या कामाची उभारणी करावी आदी मागण्यांसाठी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर खांबाडा गावानजीक गुरूवारी आ. बाळु धानोरकर यांच्या नेतृत्वात चक्का जाम करून भिख मांगो व मुंडण आंदोलन केले. त्यामुळे नागपूर- चंद्रपूर मार्गावर दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतिश भिवगडे, किशोर जोरगेवार, मनोज पाल, भारती दुधानी, संदीप गिºहे, प्रफुल चटकी, विशाल बदखल, भाष्कर ताजने, राजु चिकटे, राजेश नायडू, सुरेश पचारे, राजु महाजन, गजानन मेश्राम, युवराज मोरे, संजय घागी, प्रमोद मगरे, प्रमोद नागोसे, निलेश भालेराव, मनिष जेठानी, काशीफ खॉन, गजानन पावडे, योगेश खामनकर, प्रतिभा धानोरकर, खामनकर, व शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आदी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी खांबाडा येथे मुंडण करून भिख मांगो आंदोलन करण्यात आले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.