तिरूपती देवस्थानच्या विश्वस्तपदी सपना सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:13 PM2018-04-24T12:13:54+5:302018-04-24T12:14:02+5:30

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची निवड झाली आहे.

sapana Sudhir Mungantiwar, Trustee of Tirupati Devasthan | तिरूपती देवस्थानच्या विश्वस्तपदी सपना सुधीर मुनगंटीवार

तिरूपती देवस्थानच्या विश्वस्तपदी सपना सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext
ठळक मुद्देउपक्रमांना लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राहीलसुधीर मुनगंटीवार बालाजीचे नि:स्सीम भक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची निवड झाली आहे. आंध्रप्रदेश सरकारने जारी केलेल्या १८ सदस्यांच्या यादीत सपना मुनगंटीवार यांचा समावेश आहे.
पुट्टा सुधाकर यादव यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिसूचना २० एप्रिल रोजी जारी करण्यात आली. आंध्र प्रदेश सरकारच्या महसूल विभागाने जारी केलेल्या यादीत प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचाही समावेश आहे. सुधीर मुनगंटीवार हे तिरुपतीचे नि:स्सीम भक्त आहेत. विश्वस्तपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सपना मुनगंटीवार म्हणाल्या, तिरुमलावर आमची श्रद्धा आहे. आंध्रप्रदेश सरकारने या प्रतिष्ठित देवस्थानवर माझी सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल आनंद झाला. या देवस्थानतर्फे राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांना अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आपला प्रयत्न राहील.

Web Title: sapana Sudhir Mungantiwar, Trustee of Tirupati Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.