राकाँचा लॉलीपॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:45 PM2017-09-22T23:45:04+5:302017-09-22T23:45:14+5:30

Rokai lollipop | राकाँचा लॉलीपॉप

राकाँचा लॉलीपॉप

Next
ठळक मुद्देमहागाईचा भस्मासूर वाढत असल्याने गोरगरीब व सामान्य जनता बेजार झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘अच्छे दिना’च्या नावाखाली केंद्र व राज्य सरकार जनतेची आर्थिक पिळवणूक करीत असून दिवसेंदिवस महागाईचा भस्मासूर वाढत असल्याने गोरगरीब व सामान्य जनता बेजार झाली आहे. बेजार झालेल्या नागरिकांचा आवाज शासन दरबारी पोहोचविण्यासाठी शुक्रवारी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चंद्रपुरात लॉलीपॉप मोर्चा काढण्यात आला.
येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लॉलीपॉप मोर्चाची सुरूवात करण्यात आली. ‘नही चलेगी, नही चलेगी अच्छे दिनकी सरकार नही चलेगी’ अशा घोषणा देत निघालेला लॉलीपॉप मोर्चात जिल्ह्यातील व शहरातील हजारो कार्यकर्ते व बेजार झालेले नागरिक सहभागी झाले होते. केंद्र व राज्य सरकार महागाई थांबविण्यात अपयशी ठरत असून जनतेला जीवनावश्यक असलेल्या अन्नधान्य व वस्तुंचे, वीज बिल तसेच स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरची किंमती तिपटीने वाढवून गृहिणींचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ आणि पीक कर्जाच्या योजनेत सावळागोंधळ चालविल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या सर्व मागण्यांकडे लॉलीपॉप मोर्चाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या लॉलीपॉप मोर्चा दरम्यान ठिकठिकाणी लॉलीपॉपचे वितरण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी आ. सुदर्शन निमकर, शहरध्यक्ष शशीकांत देशकर, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, मनपा गटनेते दीपक जयस्वाल, नगरसेवक मंगला आकरे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, हिराचंद बोरकुटे, डी.के. आरीकर, ज्योती रंगारी, सुनिल काळे, अ‍ॅड. गणेश गिरीधर, मुनाज शेख, संजय वैद्य, निलेश मानकर, प्रशांत चिप्पावार, पंकज पवार, विजयालक्ष्मी डोहे आदी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २८ सप्टेंबर रोजी सावली येथे दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर लॉलीपॉप मोर्चा काढण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात टप्प्याटप्प्याने मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे गड्डमवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Rokai lollipop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.