पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:53 PM2019-05-15T23:53:05+5:302019-05-15T23:53:42+5:30

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे चंद्रपूर-मूल महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या कामादरम्यान चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे मंगळवारी शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा ठप्प होता. दरम्यान, मनपाचे अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी २१ तास युध्दस्तरावर दुरुस्तीचे काम करून काही भागातील पाणी पुरवठा सुरू केला.

Repair of the pipeline repair work on a war footing | पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे चंद्रपूर-मूल महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या कामादरम्यान चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे मंगळवारी शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा ठप्प होता. दरम्यान, मनपाचे अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी २१ तास युध्दस्तरावर दुरुस्तीचे काम करून काही भागातील पाणी पुरवठा सुरू केला. मात्र शहरातील इतर भागातील पाणी पुरवठा पूर्ववत होण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.
आधीच चंद्रपूरकर पाणी टंचाईने त्रस्त आहेत. अशातच आता ही समस्या उदभवल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सावरकर चौक ते बंगाली कॅम्प (मूल रोड) येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे याच भागातून चंद्रपूर शहर महानगरपालिकेची तुकूम जलशुद्धीकरण केंद्र ते बाबुपेठ येथील पाणीपुरवठा करणारी ५०० एमएम व्यासाची जलवाहिनी गेली आहे. सोमवारी चंद्रपूर-मूल महामार्गाचे बांधकाम सुरू असताना शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनच जेसीबीने विस्कळीत करण्यात आली. त्यामुळे शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा करण्यासाठी जमा होणारे पाणी टाकीत जमा झाले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी याची माहिती महानगरपालिकेला सोमवारी दिली नाही. मंगळवारी सकाळी टाकीत पाणी जमा न झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पाईपलाईन फुटल्याचे मनपा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. माहिती मिळताच महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता महेश बारई, अभियंता विजय बोरीकर व उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे योगेश समरीत हे घटनास्थळी गेले. पाण्याची टंचाई लक्षात घेत तत्काळ दुरुस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. तब्बल सतत २१ तास हे काम करण्यात आले. त्यामुळे पाण्याच्या टाकीत पाणी पोहचले. यामुळे बुधवारी काही भागात पाणी पुरवठा होऊ शकला. संपूर्ण भागातील पाणी पुरवठा सुरुळीत होण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

दूषित पाण्याचा पुरवठा
सोमवारी पाईपलाईन फुटल्यानंतर मंगळवारी युध्दस्तरावर दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यानंतर बुधवारी टाकीत पाणी तर पोहचले. मात्र बांधकामातील माती या पाईपलाईनमध्ये गेल्याने हे पाणी दूषित झाले. दरम्यान, बुधवारी सकाळी वॉर्डांमध्ये पाणी पुरवठा केल्यानंतर बराच वेळ दूषित व लालसर पाणी आले. तुकूम प्रभागात २०-२५ मिनिटे नळाद्वारे पाणी आले. मात्र दूषित पाणी आल्याचे नगरसेवक सुरेश पचारे यांनी सांगितले.

पाईपलाईन फुटल्याचे माहीत झाल्यानंतर दुरुस्तीचे काम युध्दस्तरावर करण्यात आले. रात्री ३ वाजेपर्यंत हे काम सतत सुरू राहिले. त्यानंतर टाकीत पाणी पोहचले. त्यामुळे बुधवारी सकाळी काही भागात पाणी पुरवठा करण्यात आला.
- महेश बारई,
मुख्य अभियंता, बांधकाम विभाग, मनपा.

Web Title: Repair of the pipeline repair work on a war footing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.