हवाई सफरसाठी राधाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:46 PM2018-06-23T22:46:29+5:302018-06-23T22:46:50+5:30

सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेचे असे नाही. मात्र ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेवून यशस्वी झालेली चिमूर शहरातील राधा अजय चौधरी ही विद्यार्थिनी आता हवाई सफार करणार आहे.

Radha's selection for air travel | हवाई सफरसाठी राधाची निवड

हवाई सफरसाठी राधाची निवड

Next
ठळक मुद्देसेंट क्लेरेट इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी : लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेचे असे नाही. मात्र ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेवून यशस्वी झालेली चिमूर शहरातील राधा अजय चौधरी ही विद्यार्थिनी आता हवाई सफार करणार आहे.
लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी चिमूर येथील सेंट क्लेरेट इंग्लिश मिडियम स्कुलमधील राधा अजय चौधरी हिची निवड करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा, यासाठी लोकमत परिवाराच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच उपक्रमाअंतर्गत लोकमत संस्कार मोती २०१७-१८ मध्ये शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
ही स्पर्धा १ जुलै ते १० आॅक्टोबर या १०० दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील हजारो शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. यातील सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत परिवारातर्फे बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते. याच स्पर्धेत जिल्हानिहाय एका विद्यार्थी स्पर्धकाची नागपूर-दिल्ली-नागपूर या हवाई सफरसाठी निवड करण्यात येणार होती. यात शहरातील सेंट क्लारेट इंग्लिश मिडियम विद्यालयाची विद्यार्थिनी राधा चौधरी हिची निवड करण्यात आली आहे. ही हवाई सफर एक दिवसाची असून येत्या २६ जून २०१८ ला होणार आहे.
हवाई सफरसाठी राधा चौधरी हिच्या नागपूर येथून दिल्ली व परत नागपूरपर्यंतचा प्रवास खर्च लोकमत परिवार उचलणार आहे. निवड झालेले विद्यार्थी दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत.

Web Title: Radha's selection for air travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.