गरिबांना उत्तमोत्तम उपचार देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:10 PM2019-01-18T22:10:59+5:302019-01-18T22:11:42+5:30

देशातील गरीबांना उत्तमोत्तम उपचार अगदी मोफत, सुलभ व सहज मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित आरोग्य मेळाव्याने अनेक रुग्णांना आरोग्याच्या योजना, उपचार पध्दती व उपचार सोयी प्राप्त झाल्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंद व्यक्त केला.

Provide best treatment to the poor | गरिबांना उत्तमोत्तम उपचार देणार

गरिबांना उत्तमोत्तम उपचार देणार

googlenewsNext
ठळक मुद्देहंसराज अहीर : चांदा क्लबवरील रोगनिदान, उपचार महामेळाव्याची सागंता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशातील गरीबांना उत्तमोत्तम उपचार अगदी मोफत, सुलभ व सहज मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित आरोग्य मेळाव्याने अनेक रुग्णांना आरोग्याच्या योजना, उपचार पध्दती व उपचार सोयी प्राप्त झाल्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंद व्यक्त केला. गरिबांना उत्तमोत्तम उपचार देण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन ना. अहीर यांनी केले. शुक्रवारी या मेळाव्याची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे, दोन दिवसात आठ हजाराच्या जवळपास रुग्णांना या मेळाव्यातून मोफत उपचार देण्यात आले.
या समारोपाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.बी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे तसेच चंद्रपूर शहरातील तज्ज्ञ व नामावंत डॉक्टरमंडळी उपस्थित होते.
या दोन दिवसीय महामेळाव्यात आठ हजार रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून त्यांच्यावर वेगवेगळया आजाराची मोफत तपासणी करुन उपचार करण्यात आले. मधुमेहग्रस्त बालकांना उत्तम प्रतिचे ग्लुकोमिटर वाटप करण्यात आले असून मधुमेह आजारावर उपचार भरपूर आहेत. पण गरीब व सर्वसाधारण कुटुंबातील जनतेसाठी ते खूप खर्चिक आहे. त्यामुळे गरिबी संपवायची असेल तर सर्वांना औषधोपचार मिळाला पाहिजे, असे ना.अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. एम. जे. खान यांचा गुणगौरव करण्यात आला. या आरोग्य मेळाव्याला सहकार्य केलेल्या सर्व डॉक्टर मंडळीचासुध्दा सन्मान करण्यात आला. तसेच चंद्रपूर येथे ५० वर्षांपासून प्रदीर्घ सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग या सर्व विभागांनी या आरोग्य मेळाव्याला विशेष सहकार्य केल्याबद्दल ना.अहीर यांनी सर्वांचे कौतुक केले.
 

Web Title: Provide best treatment to the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.