हरवलेला ऐवज परत करण्याचा कार्यक्रम विश्वास वाढविणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:06 AM2019-06-10T00:06:33+5:302019-06-10T00:06:56+5:30

आपला चोरी गेलेला माल आपल्याला परत मिळेल की नाही, याबद्दलची साशंकता कायम असते. पोलिसांकडे गेल्यानंतरही तो ऐवज परत मिळेल काय याबाबत कायम शंका असते. मात्र चंद्रपूर पोलिसांनी विश्वास आणि पारदर्शी कार्य करीत अगदी विक्रमी वेळात हा मुद्देमाल लोकांना जाहीर कार्यक्रमात परत केला, याचा आपल्याला आनंद आहे.

The program to return the lost losers boosts the faith | हरवलेला ऐवज परत करण्याचा कार्यक्रम विश्वास वाढविणारा

हरवलेला ऐवज परत करण्याचा कार्यक्रम विश्वास वाढविणारा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ७३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांच्या सुपुर्द

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपला चोरी गेलेला माल आपल्याला परत मिळेल की नाही, याबद्दलची साशंकता कायम असते. पोलिसांकडे गेल्यानंतरही तो ऐवज परत मिळेल काय याबाबत कायम शंका असते. मात्र चंद्रपूर पोलिसांनी विश्वास आणि पारदर्शी कार्य करीत अगदी विक्रमी वेळात हा मुद्देमाल लोकांना जाहीर कार्यक्रमात परत केला, याचा आपल्याला आनंद आहे. हरवलेल्या ऐवज परत करण्याच्या अशा कार्यक्रमांमधून पोलिसांप्रति जनतेचा विश्वास वाढतो व पारदर्शी कार्यक्रमाला जनतेकडून प्रतिसाद मिळतो, असे कौतुकाचे उदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज काढले.
सामान्य नागरिकांचे चोरी गेलेले आभूषण, पैसे, मोटारसायकली, मोबाईल फोन व अन्य बहुमूल्य वस्तू पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सन्मानपूर्वक सोहळ्यात परत करतात, असा स्वप्नवत वाटणारा व बदल दर्शविणारा सोहळा आज चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळाला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित या सोहळ्यामध्ये ७३ लाख रुपयांच्या वस्तू नागरिकांना सुपूर्द करण्यात आल्यात. गेल्या दोन महिन्यात चोरी गेलेल्या वस्तूंपैकी ३२ टक्के वस्तू मुद्देमालासह परत करण्याचा विक्रम चंद्रपूर पोलिसांनी केला असून त्याचा अभिनव सोहळा आज पोलीस मैदानावर पार पडला.
चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेडमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. यावेळी आमदार नाना श्यामकुळे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ठाण्याचे ठाणेदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याठिकाणी उल्लेखनीय उपस्थिती होती ते गेल्या काही महिन्यात ज्याच्या वस्तू हरवल्या आहेत, अशा सामान्य नागरिकांची. ७३ लाख ८५३ रुपयांचा मुद्देमाल यावेळी जनतेला परत करण्यात आला.
पालकमंत्र्यांची सायकलही चोरी गेली होती
आपल्या पाठपुराव्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी तीस वर्षांपूर्वी स्वत:ची हरवलेली सायकल व त्यासाठी त्यांनी पोलिसांकडे केलेल्या पाठपुराव्याचा किस्सा सांगितला. आपली सायकल हरवल्यामुळे किमान आठ दिवस तरी पोलीस स्टेशनला सतत फेऱ्या माराव्या लागल्या. माझे नियमित पाठपुरावा करणे आणि त्या सायकलची माझ्यासाठीची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर सततच्या तगाद्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाºयाने मला चहा पाजून माझी चोरी गेली सायकल परत केली, असे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The program to return the lost losers boosts the faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.