नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:47 AM2019-06-21T00:47:37+5:302019-06-21T00:49:18+5:30

शेतकऱ्यांच्या विकासासाठी तयार केलेल्या विविध योजना आणि अन्य विकासात्मक कामे करताना सर्वप्रथम जनतेचे प्रश्न सोडविण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिल्या.

Prefer to solve the problems of citizens | नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय आयुक्त : जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या विकासासाठी तयार केलेल्या विविध योजना आणि अन्य विकासात्मक कामे करताना सर्वप्रथम जनतेचे प्रश्न सोडविण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिल्या.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांच्या अंमलबजावणी संदर्भात गुरूवारी नियोजन भवनात विभागनिहाय आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विभागीय उपायुक्त तेलंग, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर उपस्थित होते. सुरुवातीला कृषी विभागाचा आढावा घेत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या नियोजन आराखड्यावर चर्चा करण्यात आली. यात एकूण खरीप क्षेत्र, लागवडी योग्य क्षेत्र, पीकनिहाय आढावा, पीक विमा लाभार्थ्यांबाबतची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी विभागीय आयुक्तांना दिली. पाऊस लांबल्यामुळे शेतकºयांना अडचणी निर्माण होत आहेत. योग्य हवामानाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचवावी. बियाणे, खते शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात कोणतीही दिरंगाई करू नये. येत्या रब्बी हंगामाचा व्यवस्थापन आराखडा आताच तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

शेतकºयांची माहिती अचूक अपलोड करा
प्रधानमंत्री किसान योजनेचा आढावा घेत पात्र शेतकºयांची आकडेवारीची तपासणी करून जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती आॅनलाइन अपलोड करण्यात येणाºया अडचणीवर अधिकाºयांशी चर्चा केली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेकरिता दोन हेक्टरचा असलेला निकष काढून टाकण्यात आला. संपूर्ण शेतक ºयांची अचूक माहिती गोळा करून आॅनलाइन प्रणालीत अपलोड करून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिल्या.
जि. प. योजनांचीही केली चौकशी
जिल्हा परिषदच्या कन्नमवार सभागृहातील बैठकीत विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली.आरोग्य सेवेतील सूक्ष्म गोष्टीचा आढावा वैद्यकीय अधिकाºयांकडून घेतला. गरोदर माता, नवजात बालकांना विशेष सुविधा सहित योग्य उपचार करण्याचे निर्देश देत तालुका आरोग्य अधिकाºयांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश दिले.

Web Title: Prefer to solve the problems of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.