विजेअभावी आरोग्य सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:16 AM2018-06-22T00:16:26+5:302018-06-22T00:16:26+5:30

दोन-चार तासांचा अपवाद वगळला तर मागील २० तासांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित आहे. यामुळे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली.

 Powerless health service collapses | विजेअभावी आरोग्य सेवा कोलमडली

विजेअभावी आरोग्य सेवा कोलमडली

Next
ठळक मुद्देसामान्य रुग्णालयच आयसीयूत : २० तासांपासून वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन-चार तासांचा अपवाद वगळला तर मागील २० तासांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित आहे. यामुळे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली. यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहे. एक्स-रे, सोनोग्राफी, पंखे, कुलर व दिवे बंद आहे. मागील २० तासांपासून रुग्णालयात एकही एक्स-रे किंवा सोनोग्राफी करण्यात आली नाही.

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. येथे मेडिकल कॉलेज झाल्यापासून इतर जिल्ह्यातील रुग्णही येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले जातात. एकूणच हे रुग्णालय आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बुधवारी रात्री १२ वाजता अचानक रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला. नेहमीप्रमाणे काही वेळासाठी खंडित झाला असेल म्हणून याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. मात्र पहाटे ४ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यानंतर वीज पुरवठा सुरू झाला. मात्र काही वेळातच पुन्हा वीज गेली. त्यामुळे रुग्णालयात एकच धावपळ उडाली. गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंतही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले आहे. रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
महावितरणच्या यंत्रणेत बिघाड नाही
चंद्रपूर सामान्य रुग्णालयातील वीज पुरवठा महावितरणच्या यंत्रणेमुळे खंडित झाला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. येथील रुग्णालयाच्या अंतर्गत यंत्रणेतील बिघाडामुळे वीज पुरवठा बंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महावितरणकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यात दोष नसून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वीज मीटरपर्यंत वीजपुरवठा व्यवस्थित असल्याचे महावितरणच्या पथकाच्या पाहणी स्पष्ट झाले आहे. तरीही महावितरणचे अधिकारी व हॉस्पिटल शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता टिकेश राऊत स्वत: जिल्हा रुग्णालय प्रशासनास मदत करीत आहेत.
नागपूरचे पथक दाखल
मागील २० तासांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित असल्याने मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. मोरे यांनी यासंदर्भात नागपूर येथील वरिष्ठांना माहिती दिली आहे. नागपूर येथील एक पथक गुरुवारी दुपारी सामान्य रुग्णालयात दाखल झाले असून ते वीज दुरुस्तीचे काम करीत आहेत.

Web Title:  Powerless health service collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य