बिबट्याचे झाडावर बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:13 PM2018-05-24T23:13:13+5:302018-05-24T23:13:50+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रालगत कवडशी ( रोडी) येथील शेतकरी शिवारात कामासाठी गेले असता शेतात असलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर बिबट्याने तेथील एका झाडावर बस्तान मांडले. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी झाडाभोवताल एकच गर्दी केली होती.

Planting on Leopard's Tree | बिबट्याचे झाडावर बस्तान

बिबट्याचे झाडावर बस्तान

googlenewsNext
ठळक मुद्देहल्ल्यात शेतकरी जखमी : बघ्यांची उसळली होती गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रालगत कवडशी ( रोडी) येथील शेतकरी शिवारात कामासाठी गेले असता शेतात असलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर बिबट्याने तेथील एका झाडावर बस्तान मांडले. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी झाडाभोवताल एकच गर्दी केली होती.
आभिमान शंभरकर (५२) रा. कवडशी ( रोडी ) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकºयाचे नाव आहे. चिमूर नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक ९ मध्ये येणाºया कवडशी ( रोडी ) येथील शिवारात व चिमूर पाणी पुरवठा वाटर फिल्टर प्लान्ट परिसरात मागील चार दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या बिबट्याने गुरुवारी अचानक कवडशी येथील शेतकरी अभिमन शंभरकर यांच्यावर अचानक हल्ला करून जखमी केले. मात्र शेतकºयाने मोठया हिंमतीने या बिबट्याचा हल्ला परतवला व स्वत:चे रक्षण केले. या हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी झाले असून त्यांच्या मानेला, खांद्यावर जखमा झाल्या आहेत. जखमी शेतकºयावर उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरू आहेत.
बिबट्याने शेतकºयावर हल्ला करून शेतात असलेल्या मोहाच्या झाडावर चढून बस्तान मांडले. घटनेची माहिती वन विभागाला देताच वन परिक्षेत्र अधिकारी बी. पी. चिवंडे आपल्या ताफ्यासह घटना स्थळावर दाखल झाले. मात्र घटनास्थळावर बघ्यांची एक गर्दी उसळल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणेदार दिनेश लबडे ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. सायंकाळपर्यंत ते गर्दीवर नियंत्रण ठेवून होते.
कवडशीला जत्रेचे स्वरुप
चिमूरपासून दोन कि.मी. अंतरावर उमा नदीच्या काठावर वसलेल्या कवडशी ( रोडी ) गावाशेजारी बिबट असल्याची माहिती शहरात पसरताच शेकडो महिला-पुरुषांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे कवडशी गावाला जत्रेचे स्वरूप आले होते.
बिबट्याला पांगवण्यासाठी फोडले फटाके
शेतकºयाला जखमी करून बिबट्याने चक्क मोहाच्या झाडाचा आसरा घेतला. त्यातच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिबट्याला झाडावरुन उतरवण्यासाठी वन कर्मचाºयांनी फटाके फोडले. मात्र बिबट झाडाखाली आला नाही. त्यामुळे वन विभागाचे हे प्रयत्नही निष्फळ ठरले.
ताडोबाची हौस कवडशीत
अनेक पर्यटक वाघाला बघण्यासाठी हजारो रुपये खर्च करून ताडोबा व्याघ्र प्रकल्यात जातात. मात्र अचानक आलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी शेकडो नागरिक परिवरासह दाखल होत होते. काही नागरिक तर आम्ही पैसे खर्चून ताडोबाला जाऊ शकत नाही. आम्हाला वाघ बघू द्या, असे वन कर्मचाऱ्यांना विनवण्या करीत होते.
बिबट्याच्या भीतीपोटी चक्क त्याने घातले हेल्मेट
वाघाला पाहण्यासाठी अनेक हवस्या-गवश्यांनी गर्दी केली होती. त्यात एक महाभाग तर चक्क हेलमेट घालूनच आला होता. नागरिक कधी बिबट्याला तर कधी त्या महाभागाला बघत होते. सुरक्षा म्हणून त्याने ही पूर्वतयारी केली होती.

Web Title: Planting on Leopard's Tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.