पिकअप व दुचाकी वाहन नदीत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:47 PM2018-01-17T22:47:52+5:302018-01-17T22:48:20+5:30

वणी-वरोरा मार्गावरील पाटाळा येथे वर्धा नदीच्या पुलावर दुचाकी व छोटा हाती पिकअप वाहनाची समोरासमोर धडक बसली.

A pick-up and two-wheeler collapsed in the river | पिकअप व दुचाकी वाहन नदीत कोसळले

पिकअप व दुचाकी वाहन नदीत कोसळले

Next

आॅनलाईन लोकमत
माजरी : वणी-वरोरा मार्गावरील पाटाळा येथे वर्धा नदीच्या पुलावर दुचाकी व छोटा हाती पिकअप वाहनाची समोरासमोर धडक बसली. या अपघातात पुलाचे रेलिंग तोडून दोन्ही वाहने नदीत कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी असून त्यांना वणीच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
दुचाकी चालक ज्ञानेश्वर बलकी रा. मरेगाव, संजय धानोरकर व व नितेश पाचभाई असे जखमींची नावे आहेत. दोन्ही वाहने भरधाव असल्याने पूलावर वाहनांची समोरासमोर धडक बसली. हा अपघात इतका जबदरस्त होता की, पुलाची रेलिंग तोडून दोन्ही वाहने नदीत कोसळले.

Web Title: A pick-up and two-wheeler collapsed in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.