आयुध निर्माणीतील कामगारांच्या प्रलंबित समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:12 AM2018-11-19T00:12:12+5:302018-11-19T00:12:34+5:30

मागील काही वर्षांपासून आयुध निर्माणीतील नोकरभरती तसेच अनुकंपाधारकांची भरती खोळंबलेली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कामगारांच्या समस्यांबाबतची अमंलबजावणी होत नसल्याची तक्रार ना. हंसराज अहीर यांना प्राप्त झाली.

Pending pending issues of armament factory workers | आयुध निर्माणीतील कामगारांच्या प्रलंबित समस्या सुटणार

आयुध निर्माणीतील कामगारांच्या प्रलंबित समस्या सुटणार

googlenewsNext
ठळक मुद्देहंसराज अहीर यांचा पुढाकार : कामगार संघटना व पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : मागील काही वर्षांपासून आयुध निर्माणीतील नोकरभरती तसेच अनुकंपाधारकांची भरती खोळंबलेली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कामगारांच्या समस्यांबाबतची अमंलबजावणी होत नसल्याची तक्रार ना. हंसराज अहीर यांना प्राप्त झाली. याची दखल घेत अहीर यांनी शनिवारी निर्माणीतील सर्व कामगार संघटनांच्या पदाधिकारी, निर्माणी प्रशासनातील अधिकारी यांची बैठक वसाहतीतील हिरा हाउस येथे घेउन अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केली. याप्रसंगी या समस्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन अहीर यांनी कामगार नेत्यांना दिली. तसेच याबाबतची कारवाई करण्याचे निर्देश निर्माणी प्रशासनाला दिले.
सन २०१२ व २०१६ या काळात येथील निर्माणीमध्ये विविध पदांसाठी ५६८ रिक्त जागा भरण्याबाबत जाहिरात काढण्यात आली होती. या जागांसाठी पात्र अर्जदारांनी अर्जसुद्धा केले होते. मात्र त्यानंतर या जागांची भरती खोळंबली. यावर निर्माणी प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याचप्रमाणे येथील २४० अनुकंपाधारकांची निवड प्रक्रिया दोन वर्षापूर्वीच पार पडली. यात पाच टक्के प्रमाणे ३५ जागा भरण्याची निर्माणी प्रशासनाने कारवाई केली. याबाबतची यादीही प्रकाशित केली. परंतु, भरतीची कारवाई अजूनही सुरू करण्यात आली नाही. सद्यास्थितीत एकही जागा भरण्यात आली नाही. यावर त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश अहीर यांनी बैठकीत महाप्रबंधकांना दिले.
त्याचप्रमाणे येथील दवाखान्यात पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रूग्णांना येथून नागपूरला हलविण्यात येते. त्यामुळे रूग्ण आणि नातेवाईकांना हेलपाटे खावून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दवाखान्याचे आधुनिकीकरण करून येथे सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीला आयुधनिर्माणीचे महाव्यवस्थापक रजनिश लोडवाल, महेश गुप्ता, तहसीलदार महेश शिंतोळे, राहुल सराफ, माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, नगरसेवक प्रशांत डाखरे, प्रवणी सातपुते, किशोर गोवारदिपे, पंढरी पिंपळकर, प्रकाश हरीदासन, राकेश पवार, सुनिल पवार, शितल वालदे, भारतीय सुरक्षा मजदूर संघाचे मनीष मत्ते, संजयसिंग, सदानंद गुप्ता व कैलास तिवारी, इंटक राजेश यादव, ओमप्रकाश पांडे, सिटूचे सदानंद वाघ, एनजीओचे संदीप मुळे उपस्थित होते.

कामगारांचे शोषण थांबवा
निर्माणीतील खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ४५० कामगार काम करीत आहेत. मात्र, या कामगारांचे आर्थिक शोषण कंपन्यांकडून होत आहे. कामगारांचे वेतन बरोबर मिळत नाही. यात त्वरीत सुधारणा करण्यात यावी, स्थायी कामगारांना काम तथा नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कामगारांनी केली. याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन ना. अहीर यांनी दिले.

Web Title: Pending pending issues of armament factory workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.