वृद्ध महिला घरकुलपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:41 AM2018-01-24T01:41:43+5:302018-01-24T01:42:04+5:30

देवाडा खुर्द येथे दोन वर्षांपूर्वी संततधार पावसामुळे घराची पडझळ झाली़ अल्पभूधारक, विधवा, निराधार महिला सुमन गद्देकार यांचे घरच कोसळले. त्यामुळे मोडकीतोडकी झोपडी उभारून दिवस काढत आहेत़ मात्र, इंदिरा योजनेसाठी पात्र मागील तीन वर्षांपासून .....

Older women deprived of cottage | वृद्ध महिला घरकुलपासून वंचित

वृद्ध महिला घरकुलपासून वंचित

Next
ठळक मुद्देदेवाडा खुर्द येथे दोन वर्षांपूर्वी संततधार पावसामुळे घराची पडझळ झाली़

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : देवाडा खुर्द येथे दोन वर्षांपूर्वी संततधार पावसामुळे घराची पडझळ झाली़ अल्पभूधारक, विधवा, निराधार महिला सुमन गद्देकार यांचे घरच कोसळले. त्यामुळे मोडकीतोडकी झोपडी उभारून दिवस काढत आहेत़ मात्र, इंदिरा योजनेसाठी पात्र मागील तीन वर्षांपासून अन्याय सहन करावा लागत आहे़ संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करून घरकुल मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे़
सुमनबाई गद्देकार स्थानिक वॉर्ड क्र. २ मध्ये वास्तव्यास आहेत़ त्यांना अपत्य नाही़ पतीच्या निधनानंतर विविध कामे करून पोटाची खडगी भरतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मोलमजुरी करुन कसेबसे आपले जीवन जगत असतांना २०१४ मध्ये मुसळधार पाऊस आल्याने त्यांचे घर कोसळले़ परिणामी, बेघर व्हावे लागले़ शेजारी राहणाऱ्या घुघुस्कार कुटुंबियांकडे काही दिवस राहावे लागले़ घर पडल्याने शासनाकडून भरपाई मिळावी, यासाठी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजविले़ मात्र, तहसील कार्यालयाकडून त्यांना केवळ १ हजार ९०० रुपयाची तुटपूंजी मदत देण्यात आली़ त्या अल्पभूधारक असून ६८ व्या वर्षीही मोलमजुरी करुन जगावे लागत आहे. परिस्थिती बघून काही नागरिकांनी पडक्या घराच्या बाजूलाच छोटीशी चंद्रमोळी झोपडी बांधून दिली़ निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ६०० रुपयांवर उदरनिर्वाह करीत आहे़

Web Title: Older women deprived of cottage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.