गडमौशी तलावाच्या नहराची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:06 AM2018-01-19T00:06:02+5:302018-01-19T00:06:13+5:30

सिंदेवाही परिसरातील गडमौशी तलावाचा मुख्य नहर विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. तक्रार करूनही पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने व्यापारी व शेतकरी त्रस्त झाले आहेत.

 Nawahar's drought at Gadohi lake | गडमौशी तलावाच्या नहराची दुरवस्था

गडमौशी तलावाच्या नहराची दुरवस्था

Next
ठळक मुद्देसिंदेवाही पाटबंधारे उपविभाग : सिंचन क्षमतेत घट

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : सिंदेवाही परिसरातील गडमौशी तलावाचा मुख्य नहर विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. तक्रार करूनही पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने व्यापारी व शेतकरी त्रस्त झाले आहेत.
घोडाझरी सिंचन उपविभागअंतर्गत गडमौशी तलाव आहे. ब्रिटीशकालीन असलेल्या या तलावाचा मुख्य नहर लोनवाही मार्गे शिवाजी चौक, जुना बसस्थानक ते इंदिरा नगरकडे गेला आहे. या तलावाअंतर्गत २५० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आहे. नहराची लांबी ५ किलोमीटर आहे. शिवाजी चौक ते जुना बसस्थानकपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने, खाजगी रुग्णालय, स्टेट बँक व विविध प्रकारची दुकाने आहेत. नहरावरील अतिक्रमण हटविण्याकरिता पाटबंधारे उपविभागाने व्यापाºयांनी नहरावर बांधलेले पूल जेसीबीने तोडून टाकले. त्यामुळे नहर ठिकठिकाणी फुटला व अनेक ठिकाणी बुजलाही आहे.
नहर जीर्ण झाल्यामुळे नहराची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यामुळे नहराची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी व शेतकरी पाणी वापर संस्थेने केली. मात्र या मागणीकडे संबधीत विभागाने कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. वीस वर्षांपासून या नहराची दुरुस्ती करण्यात आली नाही. शेतजमिनीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी ब्रिटीश काळात गडमौशी तलावाची निर्मिती करण्यात आली होती.
या नहरामुळे लोनवाही, सिंदेवाही व इंदिरा नगर परिसरातील शेतजमिनीला पाणी पुरवठा होतो. मात्र योग्य नियोजनाअभावी या नहराची दुर्दशा झाली आहे. सदर नहराचे सिमेंट क्रॉकीट लाईनिंगचे काम झालेले नाही. त्यामुळे नहर बुजले असून काही ठिकाणी पाणी साचून राहते. जुना बसस्थानकाजवळ नहर पुर्णपणे बुजलेला आहे. त्यामुळे नहर सिमेंट काँक्रीटने बांधणे आवश्यक आहे. नहराला लागून व्यापारी प्रतिष्ठाने असल्यामुळे नागरिकांना सध्या लोखंडी खांबावरून ये-जा करावे लागत आहे. त्यामुळे नहर दुरुस्तीची मागणी आहे.

गडमौशी तलावाचे नहर पाणी वापर संस्था सिंदेवाहीला हस्तांतरीत करण्यात आले आहे. नहराचे लाईनिंग, काँक्रीटचे काम करावे, अशी मागणी संस्थेने पाटबंधारे उपविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- मनोहर पवार, सचिव
शेतकरी पाणी वापर संस्था, सिंदेवाही.
नहराची किरकोळ दुरूस्ती पाणी वापर संस्थेकडे आहे. दुरूस्ती व बांधकामाचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविला आहे.
-अतुल धोतरे, उपअभियंता, सिंदेवाही

Web Title:  Nawahar's drought at Gadohi lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.