निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:38 AM2018-06-22T00:38:31+5:302018-06-22T00:38:47+5:30

मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.

The nature of nature is notable in the farmers | निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हतबल

निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हतबल

Next
ठळक मुद्देपावसाने मारली दडी : परिसरातील पेरण्या खोळंबल्या

प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी (ता.राजुरा) : मशागतीची कामे करून पावसाची प्रतीक्षा सुरू असताना दडी मारल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.
गोवरी परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू व निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्ग हा एकमेव शेतकऱ्यांचा एकमेव आधार आहे. परंतु दिवसेंदिवस निसर्गाचे रुप पूर्णत: पालटल्याने सर्व उलटे चक्र फिरायला लागले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटात शेतकरी वर्षानुवर्षापासून भरडला गेला आहे. आणि ती परिस्थिती आजही शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे उत्पादनात भरभराट होईल असे शेतकºयांना वाटत होते.
मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्याने यावर्षी निसर्ग शेतकºयांना साथ देईल असे वाटत असतानाच दिवस काही भागात समाधानकारक पाऊस पडला. शेतकºयांनी लगबगीने कपाशी लागवड व सोयाबिनची पेरणी केली. यावर्षी दुबार पेरणीचा फटका शेतकºयांना बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन खरीप हंगामाचा तोंडावर पावसाने शेतकºयांना दगा दिला. उसणवारी व कर्ज काढून महागड्या बियाण्यांची शेतकºयांनी पेरणी केली.
जवळपास दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. जमिनीत टाकलेले महागडे बियाणे पाण्याअभावी जमिनीतच करपायला लागले आहे. शेतकºयांनी पैशाची जुळवाजुळव करुन बियाणे खरेदी केली. त्यांच्या खिशात आता दमडीही पैसा शिल्लक उरली नाही. शेतकºयांवर असे दु:खाचे आभाळ कोसळले असतानाच पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली. येथेच शेतकºयांचा घात झाला.
शासन शेतकºयांच्या वेदना समजून घेत नाही. निसर्ग शेतकºयाना साथ देत नाही. शेतकºयांना पाठीवर मायेने हात फिरवून त्यांचे आभाळभर दु:ख समजून घेणारा दाता कुणीच उरला नाही. शेतकºयांचा हा एकाकी लढा आयुष्यभर असाच अविरत सुरु आहे. निसर्गाला लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेती बेभरवशाची झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा आली आहे.
शेतकरी असा आयुष्यभर वेदनांनी भरडला जात असताना या जगाच्या पोशिंद्याकडे कुणाचेही लक्ष जाऊ नये ही कृषीप्रदान देशाची मोठी शोकांतिका आहे.
ऊन, वारा, पावसाची जराही तमा न बाळगता शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहे. परंतु आजपर्यंत शेतकºयांच्या पदरी कायमची निराशाच आली आहे. याच काळ्या मातीत जन्म घ्यायचा आणि आयुष्याला सायंकाळी अखेरचा श्वासही हतबल होऊन इथेच सोडायचा, अशी विपरीत परिस्थिती शेतकºयांवर आली आहे. पाऊस पडला नाही तर शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

Web Title: The nature of nature is notable in the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.