शेतकऱ्यांना मोफत देणार तुतीची रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:25 PM2019-06-17T23:25:26+5:302019-06-17T23:25:43+5:30

जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालणार मिळण्याची आशा निर्माण झाली आहेत.

Mulberry seedlings free of cost to farmers | शेतकऱ्यांना मोफत देणार तुतीची रोपे

शेतकऱ्यांना मोफत देणार तुतीची रोपे

Next
ठळक मुद्देवृक्ष लागवड मोहीम : तुती लागवडीला मिळणार चालना, वनविभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंंद्रपूर : जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालणार मिळण्याची आशा निर्माण झाली आहेत.
राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यात वनमहोत्सव राबविण्यात येत आहे. २०१७ पासून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमंतर्गत सन २०१९ - २० या वर्षासाठी ३३ कोटी वृक्ष लागवडी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. खासगी मालकीचे पडिक क्षेत्र, शेतीचे बांध, रेल्वे दूतर्फा, कालवा, रस्ता, सामूहिक पडिक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. याशिवाय सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी नागरिकांना अल्पदरात रोपे उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदा एक महिन्याच्या रोपाकरिता महोत्सवाच्या कालावधीत प्रति रोप ८ रूपये तर १८ महिन्यांच्या रोपाकरिता ४० रूपये दर आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामाजिक वनीकरण विभागातर्फे महात्मा राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुतीची रोपे तयार करण्यात आली. ही रोपे रेशीम विभागाला मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रेशीम विभागामार्फत या रोपांचा पुरवठा जिल्ह्यातील शेतकºयांना केला जाणार आहे. जिल्ह्यात तुती लागवडीचे क्षेत्र सद्यस्थितीत अतिशय अल्प आहे. या निर्णयामुळे लागवड क्षेत्र वाढू शकेल. याकरिता रेशीम विभाग, सामाजिक वनीकरण व वनविभाग संयुक्त प्रयत्न करीत आहे.
जिल्ह्यातील रोपवाटिकेत मुबलक रोपे
जिल्ह्यातील सामाजिक संस्था व वृक्ष प्रेमी नागरिकांना ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी वनमहोत्सवाच्या कालावधीत वनविभागाकडून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील रोपवाटिकेमध्ये मुबलक प्रमाणात वृक्षांचे संवर्धन करण्यात आले. वनमहोत्सवादरम्यान नागरिकांना सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. रोपांचा तुटवडा पडल्यास सामाजिक वनीकरण विभागाकउूनही रोपे उपलब्ध होतील.

Web Title: Mulberry seedlings free of cost to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.