आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:57 PM2018-02-20T23:57:58+5:302018-02-20T23:59:00+5:30

चंद्रपूर जिल्हा हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असताना या जिल्ह्यात आम्ही उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहावे, यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे.

The message of patriotism with health | आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश

आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : रामदेवबाबांच्या उपस्थितीत योग शिबिराचा प्रारंभ

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर/मूल : चंद्रपूर जिल्हा हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असताना या जिल्ह्यात आम्ही उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहावे, यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे. योगाच्या माध्यमातून निरामय आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेशसुद्धा मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
योगऋषी रामदेवबाबा यांच्या विशेष उपस्थितीत जिल्ह्यातील मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय योग चिकित्सा व ध्यान शिबिराला मंगळवारी सकाळी ६ वाजता प्रारंभ झाला. यावेळी ना. मुनगंटीवार बोलत होते. तीन दिवस चालणाºया या शिबिराचे उद्घाटन राबदेवबाबा यांच्या हस्ते झाले. यावेळी रामदेवबाबा म्हणाले, देशाच्या बाहेर गेलेला काळा पैसा आणण्यासाठी केंद्रातील मंत्री तत्पर आहेत. देशाच्या बाहेर काळा पैसा गेलेला आहे. तो आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे. आम्हाला समाधान आहे. मोदीजींचे नेतृत्व चांगले आहे, चांगल्या विचाराने कार्य करीत आहेत. देश खूप मोठा आहे, त्यामुळे एकदम बदल होत नसले तरी लहान-लहान बदलातून एक मोठा बदल देशात होत आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठ्या पायाभुत सुविधांवर काम करीत आहे. केंद्राची उज्वल योजना ही गरिबातील गरिबापर्यंत पोहचलेली योजना आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पतंजलीचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांसह हजारोंनी घेतले धडे
या योग शिबिराच्या पहिल्याच दिवशी राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: सकाळी ६ वाजता उपस्थित राहून योगाचे धडे घेतले. रामदेवबाबांनी करून दाखविलेली विविध आसने त्यांनीही केली. त्यांच्यासोबत हजारो नागरिकांनीही योगाभ्यास केला. यावेळी पतंजली योग समितीचे विष्णू भुतडा यांनी योगाचे महत्त्व विषद केले. या योग शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
योगमय आणि उत्साहवर्धक वातावरण
मूल येथे आयोजित तीन दिवशीय योग शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यातून नागरिक योगाचे धडे गिरविण्यासाठी आले आहेत. आजुबाजुच्या खेड्यातील लोक पहाटेच मूलमध्ये दाखल होऊन योगस्थळी उपस्थित राहत आहेत. शहरात ठिकठिकाणी योगाची आसने दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत. चौकाचौकात, चहाटपरीवर योगांची माहिती आणि त्याचे फायदे, याचीच चर्चा आहे. एकूणच मूल शहरात सध्या योगमय व उत्साहवर्धक वातावरण तयार झाले आहे.
आज चंद्रपुरात महिला महासंमेलन
चंद्रपूर : महिला पतंजली योग समितीच्या वतीने २१ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता चांदा क्लब ग्राऊंडवर महलिा महासंमेलनाचे आयोजन केले आहे. यावेळी योगगुरु रामदेवबाबा, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याच्या ग्राम विकास, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: The message of patriotism with health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.