Lok Sabha Election 2019; चंद्रपुरातील उमेदवार बाळू धानोरकर यांचे रांग तोडून मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:34 AM2019-04-11T11:34:13+5:302019-04-11T11:34:54+5:30

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वरोरा येथील मतदान केंद्रावर रांग तोडून मतदान केले. यामुळे येथील मतदारांमध्ये संतापाचे वातावरण होते.

Lok Sabha Election 2019; e Balu Dhanorkar break the queue and poll | Lok Sabha Election 2019; चंद्रपुरातील उमेदवार बाळू धानोरकर यांचे रांग तोडून मतदान

Lok Sabha Election 2019; चंद्रपुरातील उमेदवार बाळू धानोरकर यांचे रांग तोडून मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वरोरा येथील मतदान केंद्रावर रांग तोडून मतदान केले. यामुळे येथील मतदारांमध्ये संतापाचे वातावरण होते.
वरोरा येथील लोकमान्य ज्युनियर कॉलेजमधील मतदान केंद्र क्रमांक १६८ वर काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर सकाळी ७.१५ वाजता मतदान करण्यासाठी गेले. दरम्यान या केंद्रावर ते येण्यापूर्वीच काही मतदार रांगेत उभे होते. मात्र धानोरकर यांनी थेट मतदान अधिकाऱ्यांकडे जाऊन मतदान केले. यामुळे रांगेतील काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात धानोरकर यांना विचारले असता, आपण रांग तोडून मतदान केले नसून रांगेतील समोरील मतदारांनीच आपल्याला प्रथम मदतान करण्यास सांगितल्यामुळे आपण रांगेत न लागता मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Lok Sabha Election 2019; e Balu Dhanorkar break the queue and poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.