गरीब आदिवासींच्या ५० घरांत उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:18 PM2018-02-16T23:18:27+5:302018-02-16T23:18:58+5:30

वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे.

Light of 50 tribals in poor tribals | गरीब आदिवासींच्या ५० घरांत उजेड

गरीब आदिवासींच्या ५० घरांत उजेड

Next
ठळक मुद्देसौभाग्य योजनेचा आधार : वीज कंपनीचा पुढाकार

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे.
जिवती तालुक्यातील घाटरायगुडा, पाटागुडा, सेवादानगर व आंबेझरी ही गावे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम व डोंगरव्याप्त भागात तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेली आहेत. गावातील लोक आदिवासी कोलाम असून त्यांचा उदरनिर्वाह शेती तसेच जंगलातून मध गोळा करण्यावर चालते. तालुका मुख्यालयापासून जवळपास १५ ते २० किमी अंतरावर असणाºया या चारही गावांत १३ ते १४ घरांची वस्ती आहे. ही चारही गावे आदिवासी गावे असून कुळाची घरे व विजेची सोय नसल्याने दिव्याच्या उजेडाखाली येथील नागरिकांना जीवन जगावे लागत होते. विद्यार्थ्यांनाही अभ्यास करण्यासाठी तेलाच्या दिव्याचा आधार घ्यावा लागत होता. याची दखल घेत चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरिश गजबे व जिवती उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मांगिलाल राठोड तसेच कनिष्ठ अभियंता विनोद भलमे यांनी पुढकार घेत घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा गावातील ११, सेवादासनगर गावातील २९ व आंबेझरी गावातील १२ अशा ५० कुटुंबाच्या जीवनात सौभाग्य योजनेतून प्रकाशाची किरणे पोहोचवून त्यांना प्रगतीची वाट दाखवली आहे.
दुर्बल लाभार्थ्यांना नि:शुल्क वीजजोडणी
पतंप्रधान यांनी सौभाग्य या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला. या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देवून राज्यात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सौभाग्य योजना वीज कंपनीकडून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीज जोडणी देण्यात येणार असून आर्थिकदृष्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीज जोडणी विनाशुल्क देण्यात येत आहे.

Web Title: Light of 50 tribals in poor tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.