चिमूरची मेघा देतेय देशभरात नेतृत्वाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:30 PM2018-06-20T22:30:44+5:302018-06-20T22:30:58+5:30

Leadership Leadership Leading the Chimur | चिमूरची मेघा देतेय देशभरात नेतृत्वाचे धडे

चिमूरची मेघा देतेय देशभरात नेतृत्वाचे धडे

Next
ठळक मुद्देब्रिक्स युवा अ‍ॅम्बेसिडरचा मान : ओजस्वी वक्तृत्वाने राष्ट्रीय स्तरावर ठसा

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर क्रांतिभूमीत जन्म घेतलेली पिटीचुवा या लहानशा खेड्याशी नाळ असलेली मेघा सुरेश रामगुंडे ही ओजस्वी वक्तृत्व कलेच्या जोरावर देशपातळीवर युवक - युवतींना नेतृत्व गुणांविषयी मार्गदर्शन करीत आहे. तिला ब्रिक्स युवा अ‍ॅम्बेसिडरचा बहुमान मिळाला आहे.
पिटीचुवा येथील सुरेश रामगुंडे यांची मेघा या मुलीचा जन्म चिमूर येथे झाला. मात्र शिक्षण बल्लारपूर येथे झाले. बि.एस्सीनंतर एलएलबीचे शिक्षण पुण्यात घेतले.
पदवी वर्षातच तिने विविध वादविवाद स्पर्धांतून वक्तृत्व शैलीचे पैलू दिले. पुणे येथील एमआयटीमध्ये पंधरा हजार विद्यार्थ्यांमधून युवा वक्ता मेघाची निवड करण्यात आली. महिला आरक्षण या विषयावर ओजस्वी व परखड मते मांडून तिने अनेकांची मने जिंकली. त्यामुळे ब्रिक्स या आंंतरराष्ट्रीय संघटनेने दिल्लीत घेतलेल्या युवा समीटमध्ये युवा वक्ता व युवा राजदूत म्हणून मेघाची निवड केली.
ब्रिक्सच्या माध्यमातून तिला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. भारतातील विविध राज्यांमधील युवक - युवतींमध्ये जागृती करण्याचे काम ती सध्या करीत आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेवर तिचे प्रभृत्व आहे. देश पातळीवर युवकांकरिता काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था विज्ञान वेद फाऊंडशेनची निर्मिती करून संचालिका आणि वक्ता म्हणून देशातील विविध राज्यांत समाजसेवेचे कार्य करीत आहे. मेघाच्या वक्तृत्वाचा आलेख उंचावत असून, हे चिमूर तालुका व जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.

Web Title: Leadership Leadership Leading the Chimur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.