कुंभार समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:57 PM2018-10-22T22:57:34+5:302018-10-22T22:57:49+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील सेलू येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करीत ‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Kumbhar community attacked the District Collector | कुंभार समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

कुंभार समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

Next
ठळक मुद्दे‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील सेलू येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करीत ‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
कुंभार समाजातील बिमार अवस्थेतली एका महिलेवर घरात कुणी नसताना घराच्या छतावरील टीन बाजूला करून घरात प्रवेश करून महिलेवर अत्याचार केला. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. अत्याच्याराच्या ‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११.०० वाजता पाताळेश्वर मंदिर, हॉस्पिटल वॉर्ड येथून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गिरणार चौकमार्गे-गांधी चौक- जटपुरा गेट - मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी मोर्चाचे रुपांतर एका सभेत झाले. सभेमध्ये मान्यवरांनी कुंभार समाजाच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडवाव्या, तेसचे यवतमाळ जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सभेच्या शेवटी शिष्टमंडळांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कुंभार समाजाचे प्रवेश सरचिटणीस सुभाष तेटेवार, जिल्हा अध्यक्ष गोपीचंद ठाकरे, कार्याध्यक्ष अरविंद वाणी, विदर्भ युवा आघाडीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. हरिष मंचलवार, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष ओमप्रकाश पांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Kumbhar community attacked the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.