ग्रामीण महिलांच्या जीवनात होत आहे नवपरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:25 PM2018-04-21T23:25:58+5:302018-04-21T23:26:09+5:30

प्रधानमंत्री उज्वला गॅस, योजना महिलांसाठी नवसंजिवनी ठरली आहे. गॅस कनेक्शन मिळणे हे ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबीयांना कठीण जात होते. नियोजन आणि दूरदृष्टीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही बाब शक्य करून दाखविली आहे.

Innovations in the lives of rural women | ग्रामीण महिलांच्या जीवनात होत आहे नवपरिवर्तन

ग्रामीण महिलांच्या जीवनात होत आहे नवपरिवर्तन

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : उज्ज्वला गॅस योजना ठरत आहे लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री उज्वला गॅस, योजना महिलांसाठी नवसंजिवनी ठरली आहे. गॅस कनेक्शन मिळणे हे ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबीयांना कठीण जात होते. नियोजन आणि दूरदृष्टीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही बाब शक्य करून दाखविली आहे. गेली कित्येक वर्ष ग्रामीण भागातील महिलांच्या नशिबी चूल आणि धूर पाचवीला पूजला होता. तो उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून दूर होत आहे. हे सरकारचे मोठे यश असून आज देशातील हजारो खेडी धुरमुक्त होतानाच त्यांचे आरोग्यही सुरक्षित राहिले आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबापर्यंत आज स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन पोहचले असल्याने ही नवक्रांती असून यापुढेही ग्रामीण महिलांच्या जीवनात नवपरिवर्तनाची पहाट उजेळल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.
कुंभेझरी येथील उज्ज्वला दिवस व ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रमास संबोधित करताना ते बोलत होते. निवृत्ती एचपी गॅस एजन्सी जिवतीच्या वतीने शुक्रवारी कुंभेझरी येथील गोरगरीब महिलांना घरगुती गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार अ‍ॅड.संजय धोटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्री, जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्कीन, जिवतीचे तहसिलदार गोपीनाथ चव्हाण, खुशाल बोंडे, जिल्हा परिषदेच्या सभापती गोदावरी केंदे्र, पं. स. उपसभापती महेश देवकते, भाजपा किसान आघाडीचे महामंत्री राजु घरोटे, आदिवासी नेते वाघु गेडाम, एच. पी. गॅसचे सेल्स आॅफीसर आशिष कुमार, प्रशांत गुंडावार आदींची उपस्थिती होती. आता विस्तारित उज्ज्वला योजनेद्वारे कनेक्शनपासून वंचित गोरगरीब महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण केले जाणार आहे. कोणतेही कुटुंब या अत्यावश्यक सोयीपासून वंचित राहणार नाही. ही केंद्र सरकारची धारणा आहे. प्रत्येक घरात वीज व गॅस कनेक्शनकरिता सरकार कटीबद्ध असल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. ग्राम स्वराज्य अभियानाद्वारे गावात लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही ना. अहीर म्हणाले. याप्रसंगी ना. अहीर व अतिथींच्या हस्ते गॅसचे वितरण सोबतच राशनकार्ड देण्यात आले.

Web Title: Innovations in the lives of rural women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.