चंद्रपूरच्या वनक्षेत्रातील जखमी वाघ चौथ्या दिवशीही उपचाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:33 PM2018-02-24T15:33:32+5:302018-02-24T15:33:42+5:30

चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक ५ मधील गाव तलावाशेजारी एका वाघाने मागील चार दिवसांपासून आश्रय घेतला आहे.

The injured tiger still waiting for treatment in the forest area of ​​Chandrapur | चंद्रपूरच्या वनक्षेत्रातील जखमी वाघ चौथ्या दिवशीही उपचाराविना

चंद्रपूरच्या वनक्षेत्रातील जखमी वाघ चौथ्या दिवशीही उपचाराविना

Next
ठळक मुद्देउजव्या पायाला व डोक्यावर जखमावाघाची प्रकृती खालावलीट्रॅक्युलायझेशनची अद्यापही परवानगी नाही

राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक ५ मधील गाव तलावाशेजारी एका वाघाने मागील चार दिवसांपासून आश्रय घेतला आहे. त्याच्या उजव्या पायाला व डोक्यावर जखमा असल्याचे दिसत आहे. वाघ जागेवरून उठून तलावातील पाणीही पिऊ शकत नाही. त्याची प्रकृती खालावत असतानाही अद्याप वनविभागाकडून त्याच्यावर उपचार केला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून २० किमी अंतरावरील भान्सुलीच्या जंगलात असलेला हा वाघ जबर जखमी आहे. जखमी असल्यामुळे तो दुसरीकडे जाण्यास हतलब ठरला आहे. गुरूवारी वनाधिकाऱ्यांनी कॅमेरे लावून त्याच्या हालचाली टिपल्या. वाघाच्या शरीरावर असलेल्या जखमा व पशु चिकीत्सकाचा अहवाल मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे.
वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी पी.सी.सी.एफ. नागपूर यांच्याकडून घ्यावी लागते. मात्र चार दिवस लोटले तरीही वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी दुपारी घटनास्थळावर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, सहायक उप वनसंरक्षक आर.एम.वाकडे, वन्यजीवप्रेमी अमोद गौरकार यांनी जखमी वाघाची पाहणी केली. जखमी वाघाच्या सुरक्षेसाठी ४० कर्मचारी पहारा देत आहेत. गुरूवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान वाघाने तलावात पाणी पिले. मात्र शुक्रवारपासून वाघ पाणी पिण्यासाठीसुद्धा गेला नाही. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी त्याच्या रस्त्यावर एका मोठ्या पात्रात पाणी भरून ठेवले आहे. मागील चार दिवसांपासून वाघाने काही खाल्ले नसल्याने तो अशक्त झाला आहे. लवकर उपचार न झाल्यास वाघाचा मृत्यु होण्याची शक्यता वन्यजीव प्रेमींकडून वर्तविली जात आहे.

चार दिवसांपासून वाघ उपाशी
जखमी व आजारी अवस्थेत असल्यामुळे वाघाला शिकार करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून वाघ उपाशीच आहे. अशक्तपणामुळे वाघ शुक्रवारी तलावात पाणी पिण्यासाठीही जाऊ शकला नाही.

Web Title: The injured tiger still waiting for treatment in the forest area of ​​Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ