बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:30 PM2017-12-10T23:30:42+5:302017-12-10T23:31:04+5:30

बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी दोन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली.

Inconvenience to cotton growers due to crop failure | बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक अडचणीत

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक अडचणीत

Next
ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल : पीक विमा योजनेचेही संरक्षण नाही

अनेकश्वर मेश्राम ।
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी दोन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. कापसाचे पीक अंतिम टप्प्यात असताना बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस पिकाला विमा योजनेचे संरक्षण नाही. अशातच कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
तालुक्यात यावर्षी पर्जन्यमानाने चांगलाच दगा दिला. यामुळे भाताचे उत्पादन हातून गेले. सरासरीच्या ५० टक्केही धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या दारात आले नाही. शेतकºयांची आशा कापूस पिकावर होती. खरीप हंगामातील याच पिकांवर शेतकऱ्यांचा आर्थिक डोलारा उभा होता. परंतु कापूस पिकांवर बोंडअळीचा प्रदुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव (पोडे), विसापूर, हडस्ती, चारवट, बामणी (दुधोली), कोठारी, दहेली, कळमना, कोर्टीमक्ता, पळसगाव, आमडी, किन्ही आदी गावात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातील शेतकऱ्यांना बोंडअळीच्या प्रादुर्भावाने मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ निसर्गाने आणली आहे.
बल्लारपूर तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असताना शासनाने पीक विमा योजनेतून वगळण्याचे कारस्थान केले. शासनाच्या पिकविमा योजनेचा लाभ नाही व बोंडअळीचा मारही सहन करायचा, या दुहेरी संकटात तालुक्यातील शेतकरी वर्ग सापडला आहे. शासकीय पातळीवर सर्वेक्षणाचा सोपस्कार केला जाणार असला तरी शेतकऱ्यांना मदत मिळेल, याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. शासनाने तालुक्यातील अडचणींत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
धान उत्पादकासोबतच कापूस उत्पादकही संकटात
बल्लारपूर तालुक्यात धान व कापूस प्रमुख पीक आहेत. एकूण सहा हजार ७६५ हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे. यामध्ये ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. धान पिकाचे क्षेत्र २ हजार ९०९६० हेक्टर आहे. तूर पिकांचे ३७३.३० हेक्टर तर सोयाबिनचा पेरा ३३३.२० हेक्टरवर आला आहे. तालुक्यात पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत अर्धेच झाले. परिणामी धानाचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी झाले. कापूस पीक जोमाने आले. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकºयांवर नामुष्की ओढवली. यामुळे तालुक्यात धान उत्पादक शेतकºयांसोबत कापूस उत्पादकही संकटात सापडला आहे.

बल्लारपूर तालुक्यात कापूस पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. याची सूचना कृषी विभागाला देण्यात आली. सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. सर्वेक्षण अहवाल तातडीने सादर करण्याची विनंती करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई मिळावी, म्हणून शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
- गोंविदा पोडे, सभापती, पंचायत समिती, बल्लारपूर

Web Title: Inconvenience to cotton growers due to crop failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.