राष्ट्रसंतांच्या विचारातून आदर्शगाव घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:58 PM2019-07-18T22:58:47+5:302019-07-18T22:59:24+5:30

राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. गावागांवात त्यांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्र बळकट होण्यास मदत होईल. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा युवकांनी पुढे न्यावा. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून आदर्श गाव घडविता येईल, असे मत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

Ideologically, from the ideals of the Rashtra, | राष्ट्रसंतांच्या विचारातून आदर्शगाव घडवा

राष्ट्रसंतांच्या विचारातून आदर्शगाव घडवा

Next
ठळक मुद्देमान्यवर : साखरीत पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. गावागांवात त्यांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्र बळकट होण्यास मदत होईल. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा युवकांनी पुढे न्यावा. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून आदर्श गाव घडविता येईल, असे मत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
राजुरा तालुक्यातील साखरी (वा.) येथे राष्ट्रसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरुकुंज आश्रम प्रचार विभागाचे केंद्रीय सदस्य अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, कृउबास सभापती कवडू पोटे, मारोती लोहे, प्रभाकर ढवस, शैलेश कावळे, नानाजी डोंगे, नरेंद्र मोहारे, सरपंच अर्जुन पाचपरे, किसन काळे, चंपत कावडकर, वासुदेव चटप, शेषराव बोंडे, पांडुरंग विरुटकर, गंगुबाई विरुटकर, वेकोलिचे प्रबंधक एकभरम उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर म्हणाले, राष्ट्रसंतांचे साहित्य समाजाला प्रेरणादायी असून आपणही समाजाचे काही देणे लागते, या उदात्त हेतूने सर्वांनी राष्ट्रसंतांचे विचार तळागाळातील लोकापर्यंत पोहचविल्यासाठी प्रचार व प्रसार करण्याची विनंती त्यांनी केली. याप्रसंगी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दानदाते पांडुरंग विरुटकर व गंगुबाई विरुटकर यांचा अ‍ॅड. सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने ढोल-ताशांचा गजर, विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकऱ्यांनी भव्य शोभायात्रा काढली.
यावेळी परिसरातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व साखरीवासीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन पंढरीनाथ घटे यांनी तर आभार शेषराव बोंडे यांनी मानले.

Web Title: Ideologically, from the ideals of the Rashtra,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.