कचरा वेचणाऱ्या चिमुकल्यांसोबत उभारली भावस्पर्शी गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:53 PM2018-03-19T23:53:01+5:302018-03-19T23:53:01+5:30

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाचे समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. चिमुकले जीव तर सणवाराला हरखून जातात. मात्र प्रत्येकांच्या जीवनात आनंदाचा व उत्सवाचा क्षण येतो, असे होत नाही.

Gudhi, who was created with garbage collection, | कचरा वेचणाऱ्या चिमुकल्यांसोबत उभारली भावस्पर्शी गुढी

कचरा वेचणाऱ्या चिमुकल्यांसोबत उभारली भावस्पर्शी गुढी

googlenewsNext
ठळक मुद्देगाडगेबाबा वाचनालयाची सामाजिक बांधिलकी : मराठी नववर्षाची अनोखी भेट

अनेकश्वर मेश्राम ।
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाचे समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. चिमुकले जीव तर सणवाराला हरखून जातात. मात्र प्रत्येकांच्या जीवनात आनंदाचा व उत्सवाचा क्षण येतो, असे होत नाही. उकीरड्यावर कचºया वेचणाºया चिमुकल्यांच्या नशिबी तर दारिद्र्य पाचवीलाच पूजले असते. समाज व्यवस्था याकडे सदैव दुर्लक्ष करते. अशातही काही संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. भावस्पर्शी व स्नेहाची अनोखी गुढी उभारून सामाजिक बांधिलकीचा परिचय देत आहेत. असाच प्रसंग बल्लारपूर येथे रविवारी दिसून आला. येथील संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाने कचरा वेचणाºया चिमुकल्यासोबत भूतकाळातील स्वप्ने विसरायला लावणारी भावस्पर्शी गुढी उभारल्याच वास्तव समोर आले.
मराठी माणूस संस्कृतीची जोपासना करणारा आहे. संस्कृतिला उत्सवाची जोड देणारा आहे. यात सामाजिक भाण ठेवणाराही आहे. सुखसमृद्धीची गुढी उभारून नव्या वर्षात वाटचाल करताना समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे आल्याचा प्रत्यय यातून दिसून येतो. बल्लारपुरात ज्या चिमुकल्यांची पहाट कचरा वेचण्यासाठी हातात थैली घ्यावी लागते. पोेटाची खळगी भरण्यासाठी उकीरडा लागतो. रस्तोरस्ती कचºयांसाठी भटकंती करावी लागते. त्यातून मिळणाºया मोबदल्यावर पोटातील आग विझवावी लागते. शहरातील हे चित्र नेहमीचे आहे. अशा चिमुकल्यांच्या नशिबी सणाला गोडधोड तर दुर्लभच, अशा चिमुकल्यांच्या चेहºयावर आनंद फुलविण्याचे कार्य येथील सामाजिक बांधिलकी जोपासणारे श्रीनिवास सुंचूवार यांनी केले. श्री लक्ष्मी नृसिंह सहकारी पतसंस्था व संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाने उकीरड्यावर कचरा वेचणाºया शेकडो मुलांना खेळातील वस्तू दिल्या. पुरणपोळीचा आपुलकीच्या भावनेतून मायेचा घास भरविला. गोड गाठी देवून गुढी पाडव्याची भावस्पर्शी गुढी उभारली.
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विकास अहीर, माजी नगरसेवक वर्षा सुंचूवार, नायब तहसीलदार दुर्गा पुरोहित, हेमा डंबारे, माया मुदगल, मंडळ अधिकारी दिलीप भडके, पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, अजय मेकलवार, सुनील दडमल, दत्तराज कुळसंगे, आशिष समुद्रवार आदींनी उपस्थिती दर्शवून सामाजिक बांधिलकीची उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. गुढी पाडव्याचे औचित्यसाधून भावनेला स्पर्श करणारी गुढी उभारण्याचा प्रसंग समाजाला प्रेरणादायी ठरणारा आहे.

Web Title: Gudhi, who was created with garbage collection,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.