सरकार शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:59 PM2019-01-15T22:59:18+5:302019-01-15T22:59:47+5:30

केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करत आहे. उत्पादन वाढावे, मार्केटिंग, पॅकेजिंगपासून तर रास्त भाव मिळावे, यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. शेतीला प्रतिष्ठा देण्याचे व उत्तम मिळकतीचे साधन बनविण्याचा प्रयत्न केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. चांदा क्लब मैदानावर सुरू असलेल्या कृषी व सरस मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

The government will get a reputation for agriculture | सरकार शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणार

सरकार शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणार

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा कृषी व सरस प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करत आहे. उत्पादन वाढावे, मार्केटिंग, पॅकेजिंगपासून तर रास्त भाव मिळावे, यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. शेतीला प्रतिष्ठा देण्याचे व उत्तम मिळकतीचे साधन बनविण्याचा प्रयत्न केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. चांदा क्लब मैदानावर सुरू असलेल्या कृषी व सरस मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, सहाय्यक प्रकल्प संचालक रवींद्र मनोहरे, उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती अर्चना जीवतोडे, ब्रिजभूषण पाझारे, खुशाल बोंडे, सभापती सुनील मडावी उपस्थित होते. ना. अहीर यांनी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या मेक इन इंडिया, स्किल इंडिया व अन्य केंद्रीय योजनांचा संबंध शेती आणि शेतीमधील कौशल्य विकास यांच्याशी आहे. चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला. डाळीचे भाव गगनाला भिडले असताना शेतकºयांनी तूर उत्पादनामध्ये विक्रम केला. आता भारत देश डाळ निर्यात करू शकतो. केंद्र शासनाने अनेक गोष्टी काटेकोरपणे पाळल्या. गेल्या चार वर्र्षांत कोणतीही वाढ होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे, असेही ना. अहीर म्हणाले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे आवश्यक आहे. आपल्याकडे शेती करण्याचे कौशल्य आहे. ते परंपरेने मिळाले आहे. मात्र त्यामध्ये बदल करावे लागतील आणि त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. ज्या शेतकºयांनी शेतीमध्ये उत्तम प्रयोग केले आहेत. त्या लोकांची लक्षणीय उपस्थिती इतरांना प्रेरणादायी ठरेल, असेही ना. अहीर यावेळी स्पष्ट केले. महापौर घोटेकर, सभापती जिवतोडे, सभापती पाझारे आदींनी मार्गदर्शन केले. उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्यांना शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प संचालक मनोहरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी केले.
बचत गटांची २५ लाखांची विक्री
११ ते १५ जानेवारीदरम्यान कृषी व सरस मेळाव्यामध्ये बचत गटाच्या २५ लाखांच्या विविध वस्तूंची विक्री झाली. २५७ स्टॉल लावण्यात आले होते. पाच दिवसांमध्ये शेतीची माहिती, विक्री, मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार देखील करण्यात आला.

Web Title: The government will get a reputation for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.