१३ वर्षानंतर पूर्ण होणार गोवरीचा बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:43 AM2019-07-13T00:43:00+5:302019-07-13T00:43:50+5:30

१३ वर्षांपूर्वी निधीअभावी रखडलेला गोवरी येथील बंधारा आता पूर्णत्वास येणार असून या बंधाऱ्याच्या बांधकामाला खनिज विकास निधीतून ६६.४३ लाखांची मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदासुद्धा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी पाहिलेले शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न हा बंधारा बांधकामानंतर पूर्णत्वास येणार आहे.

Gavri Bondhara will be completed after 13 years | १३ वर्षानंतर पूर्ण होणार गोवरीचा बंधारा

१३ वर्षानंतर पूर्ण होणार गोवरीचा बंधारा

Next
ठळक मुद्देहरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण : खनिज विकास निधीतून ६६ लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : १३ वर्षांपूर्वी निधीअभावी रखडलेला गोवरी येथील बंधारा आता पूर्णत्वास येणार असून या बंधाऱ्याच्या बांधकामाला खनिज विकास निधीतून ६६.४३ लाखांची मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदासुद्धा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी पाहिलेले शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न हा बंधारा बांधकामानंतर पूर्णत्वास येणार आहे.
राजुरा तालुकचयातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर शासनाने २००६ बंधाऱ्याच्या बांधकामाला सुरुवता केली. मात्र संबंधित कंत्राटदाराने बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास नेले नाही. त्यावेळी बंधारा नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने बंधारा बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. त्यानंतर बंधारा पूर्णत्वास नेण्यााठी बंधारा समितीचे अध्यक्ष नागोबा पाटील लांडे यांनी व नागरिकांनी आमदार, खासदार व संबंधित विभागाकडे अनेकदा चकरा मारल्या. मात्र नियोजित वेळेत बंधाऱ्याचे बांधकाम न झाल्याने बंधाऱ्याचा आर्थिक बजेट वाढला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुटे यांनी बंधारा पूर्णत्वास नेण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यानंतर गोवरी येथील प्रकाश काळे यांनी या अर्धवट बंधाऱ्याची तक्रार पालकमंत्री तक्रार निवारण कक्षाकडे हॅलो चांदा अंतर्गत केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात आली. लोकमतनेही हा अर्धवट बंधारा पूर्णत्वास यावा, यासाठी वृत्तपत्रातून शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे जिल्हा खनिज निधी अंतर्गत गोवरी येथील अर्धवट बंधाऱ्याच्या बांधकामासाठी ६६ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या कामाची निविदा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न आता पूर्णत्वास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेकडो हेक्टर शेती येणार सिंचनाखाली
बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणींमुळे या परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे हा बंधारा पूर्ण झाल्यास गोवरी येथील नागरिकांना व परिसरातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा मोठा लाभ होणार आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांना हा बंधारा वरदान ठरणारा असून या बंधाऱ्यामुळे शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने गोवरीवासीयांसाठी हा बंधारा अधिक लाभदायक ठरणारा आहे.

Web Title: Gavri Bondhara will be completed after 13 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी