गीमा पाईप फॅक्टरीचे कामगार बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:54 PM2018-03-19T23:54:43+5:302018-03-19T23:54:43+5:30

येथील गीमा पाईप फॅक्टरीच्या कामगारांनी पगार वाढीच्या मागणीकरिता १६ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे या फॅक्टरीतील पाईप निर्मितीचे काम पूर्णत: ठप्प पडले असून त्याचा फटका उत्पन्नाला बसत आहे.

Gaima Pipe Factory workers stampede | गीमा पाईप फॅक्टरीचे कामगार बेमुदत संपावर

गीमा पाईप फॅक्टरीचे कामगार बेमुदत संपावर

googlenewsNext
ठळक मुद्देव्यवस्थापनाचे दुर्लक्ष : लाखोंचे उत्पादन ठप्प

आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : येथील गीमा पाईप फॅक्टरीच्या कामगारांनी पगार वाढीच्या मागणीकरिता १६ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे या फॅक्टरीतील पाईप निर्मितीचे काम पूर्णत: ठप्प पडले असून त्याचा फटका उत्पन्नाला बसत आहे.
गीमा पाईप फॅक्टरी मातीची भांडी, वस्तुचा कारखाना या सदरात मोडते. या फॅक्टरीतील कामगारांना किमान वेतन लागू आहे. त्यानुसार वेतन मिळावे, अशी कामगारांची मागणी आहे. भारतीय मजदूर संघ संलग्नीत दि कमर्शियल अ‍ॅड इंडस्ट्रीज लेबर युनियन या कामगार संघटनेने ही मागणी उचलून धरली. वेतन वाढीची वारंवार मागणी करूनही व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागले, असे कामगार व त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
या फॅक्टरीत ८५ कामगार असून त्यात २९ नियमीत, २२ रोजंदारी व इतर ठेकेदारी आहेत. या फॅक्टरीत पाईपचे उत्पादन नियमित व मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळेच आमची पगार वाढीची मागणी आहे व ते न्याय आहे, असे या युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर राहुल, स्थानीक अध्यक्ष मनोज कोंडेकर व सचिव विलास दानव यांनी म्हटले आहे.
याबाबत फॅक्टरीचे मुख्य महाव्यवस्थापक राजेंद्रकुमार शर्मा यांना विचारणा केली असता, फॅक्टरीची स्थिती फारशी चांगली नाही. पाईप मालाला उठाव नसल्याने मर्यादीत माल काढावा लागतो. त्यामुळे फॅक्टरी तोट्यात चालू आहे. ही स्थिती सुधारण्याचा आमचा प्रयत्न असून ही फॅक्टरी चांगल्या स्थितीत आल्यानंतर आम्ही कामगारांची पगार वाढ करणार आहोत. पण कामगार मानत नाहीत. पगार वाढ करणे सध्या शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
फॅक्टरीतील कामगारांची समस्या सोडविण्याकरिता चंद्रपूरचे सहायक कामगार आयुक्त यांनी २० मार्चला चंद्रपूरला दुपारी ११ वाजता व्यवस्थापन, कामगार प्रतिनिधी यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीतून काही तोडगा निघण्याची शक्यता असली तरी कामगार मागण्यांवर ठाम आहेत.

Web Title: Gaima Pipe Factory workers stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.