चार हजार ६०६ वीज ग्राहकांची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:07 AM2018-12-13T00:07:05+5:302018-12-13T00:07:28+5:30

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत चार हजार ६०६ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Four thousand 606 electricity consumers lost their batteries | चार हजार ६०६ वीज ग्राहकांची बत्ती गूल

चार हजार ६०६ वीज ग्राहकांची बत्ती गूल

Next
ठळक मुद्देधडक मोहीम : थकबाकीविरोधात महावितरणची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत चार हजार ६०६ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना आॅनलाईन पेमेंट, मोबाईल अ‍ॅप, एनी टाईम पेमेंट मशीन्स यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु अनेक थकबाकीदारांनी अद्यापही वीज बिलाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे महावितरणच्या अंगावरील बोझा वाढत चालला आहे. वीजबिल वसुली, वीजचोरी पकडणे अशा अनेक कामात महावितरणच्या कर्मचाऱ्यांची उर्जा खर्च होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वारंवार जनजागृती करून देयकाचा भरणा करण्याविषयी सांगितले जात आहे. मात्र याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता थकबाकीदारांविरोधात महावितरणने धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. थकबाकीदारामुळे महावितरणला अडचणीचा सामना करावा लागत आहे.
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे १८ कोटी ५१ लाख रुपये थकबाकी आहे. वाणिज्यिक गाहकांकडे सहा कोटी नऊ लाख तर औद्योगिक ग्राहकांकडे ६४ लाख थकबाकी जमा झाली आहे. ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडे ९७ लाख तर ग्रामीण व शहरी पथदिव्यांची थकबाकी २२५ कोटी रुपयांवर पोहचली आहे.
महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे.
वीज ग्राहकांकडून वीज बिल विहित मुदतीत वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच वसुलीत निष्काळजीपणा बाळगणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कठोर कारवाईचे निर्देश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिले आहेत.
दरम्यान, या अनुषंगाने महावितरणने आता धडक मोहीम सुरू केली असून आतापर्यंत चार हजार ६०६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बिलाचा भरणा न केल्यामुळे खंडित केला आहे.
थकबाकीदार ग्राहकांनी थकित असलेले वीज बिल त्वरित भरून महावितरणला सहकार्य करावे. व आपला वीज पुरवठा सुरळीत ठेवावा.
-अरविंद भादिकर, मुख्य अभियंता,
महावितरण, चंद्रपूर.

Web Title: Four thousand 606 electricity consumers lost their batteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज