वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच वनविभाग अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:38 AM2018-12-24T00:38:35+5:302018-12-24T00:40:51+5:30

महाराष्ट्राच्या हरित सेनेत ५४ लाखांच्या वर सदस्यांची नोंदणी झाली असून ही जगातील सर्वात मोठी सेना ठरली आहे. वनेतर क्षेत्र वाढविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राला रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातील सुवर्ण पदकाने नुकतेच स्कॉच या संस्थेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले आहे.

Forest Department is the main reason behind the hard work's hard work | वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच वनविभाग अग्रेसर

वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच वनविभाग अग्रेसर

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : वन व सामाजिक वनीकरण कर्मचारी संघटनेचे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्राच्या हरित सेनेत ५४ लाखांच्या वर सदस्यांची नोंदणी झाली असून ही जगातील सर्वात मोठी सेना ठरली आहे. वनेतर क्षेत्र वाढविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राला रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातील सुवर्ण पदकाने नुकतेच स्कॉच या संस्थेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले आहे. आसामनंतर आता पोंभुर्णा येथे टूथपिकचे उत्पादन होणार आहे. वृक्षलागवड मोहिमेमध्येसुद्धा महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. असे प्रत्येक आघाडयांवर महाराष्ट्राचा वनविभाग अग्रेसर ठरला असून वनमंत्री म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. वनकर्मचारी व अधिकाºयांच्या परिश्रमांचे हे फलित असल्याचे कौतुकोद्गार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी नाटयगृहात आयोजित वनकर्मचाऱ्यांच्या चवथ्या राज्यस्तरीय अधिवेशनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर पदमश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, महापौर अंजली घोटेकर, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील अडगुरे, सरचिटणीस संतोष अतकरे, राजा आकाश आदींची उपस्थिती होती. या अधिवेशनाचे उदघाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वनकर्मचारी संघटनेच्या वतीने प्रकाशित दिनदर्शिकेचे विमोचन ना. मुनगंटीवार व डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रूपयांचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपुर्द केला. यावेळी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक पदमश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी वनकर्मचारी संघटनेच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचे कार्य इतर शासकीय कर्मचारी संघटनांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. वन व सामाजिक वनीकरण कार्यालय कर्मचारी संघटनेच्या वतीने ना.मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.

वनकर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा
वनांचे संवर्धन व संरक्षण तसेच वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे. हे कार्य वनकर्मचारी नेटाने व परिश्रमपूर्वक करीत आहेत. महाराष्ट्र वृक्ष लागवडीच्या क्षेत्रात अग्रणी ठरला आहे. याचे श्रेय वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमाला जाते. वनकर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत, असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. संघटनेच्या वतीने ज्या मागण्या आज निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे ना.मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

Web Title: Forest Department is the main reason behind the hard work's hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.