हॉटेलला आग; दीड लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:31 AM2019-05-27T00:31:56+5:302019-05-27T00:32:33+5:30

ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील हॉटेलला अचानक लागली. नगरपरिषदच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. आगीत अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले.

Fire to the hotel; Loss of one and a half lakh | हॉटेलला आग; दीड लाखाचे नुकसान

हॉटेलला आग; दीड लाखाचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील हॉटेलला अचानक लागली. नगरपरिषदच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. आगीत अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले.
कुर्झा वॉर्डातील हॉटेलमालक विनायक चोले हे हॉटेल कामात व्यस्त असताना अचानक हॉटेलच्या मागच्या बाजुने आग लागली. आग लागल्याचे दिसताच नागरिकांनी विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु सूर्य आग ओकत असल्याने आगीने रौद्र्ररूप धारण केले.
आगीची माहिती नगरपरिषदला मिळताच अग्निशामक दलाचे वाहन दाखल झाले. परंतु, वाहनात पुरेसे पाणी असल्याने ते थोड्या वेळेतच संपले. आगी विझण्यासाठी दुसऱ्यांंदा पाणी भरून आणावे लागले तोपर्यंत आग सुरूच होती. परिणामी, आग विझविण्यासाठी दीड तास लागले. तोपर्यंत हॉटेलचे सर्व सामान खाक झाले होते. अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले.

Web Title: Fire to the hotel; Loss of one and a half lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग