Fire at the Chandrapur Sub-station | चंद्रपुरात महापारेषणच्या सबस्टेशनला आग

वरोरा (चंद्रपूर) : शहरातील रत्नमाला चौकात असलेल्या महापारेषणच्या २२० केव्हीच्या वीज उपकेंद्राला मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड होऊन माढेळी-नागरी या उपकेंद्रांतर्गत येणाºया ३५ गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तो २४ तासांत पूर्ववत होईल, असे महावितरणचे अभियंता विनोद भोयर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मंगळवारी रात्री महापारेषणच्या २२० केव्ही सबस्टेशनमधील ३० केव्हीचे करंट ट्रान्सफॉर्मर फेल झाले. यामुळे आॅइलला आग आगली. आगीमुळे ट्रान्सफॉर्मरनेही पेट घेतला आणि भडका उडाला. अग्निशामक पथकाने अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र ३३ केव्हीचे ब्रेकर, लायटनिंग, करंट ट्रान्सफॉर्मर यांसह काही उपकरणांचे नुकसान झाले.

करंट ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यामुळे ही आग लागली. २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यात महापारेषणचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
- व्ही. डी. पद्मावार, कार्यकारी अभियंता, महापारेषण, वरोरा.