हस्तकौशल्य आत्मसात करुन रोजगार मिळवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:22 PM2018-07-21T23:22:19+5:302018-07-21T23:22:39+5:30

बांबू हस्तकला प्रशिक्षण योग्य प्रकार आत्मसात करुन कारागृहातून सुटल्यानंतर बीआरटीसीमार्फत रोजगार प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना केले.

Find employment by acquiring craftsmanship | हस्तकौशल्य आत्मसात करुन रोजगार मिळवावा

हस्तकौशल्य आत्मसात करुन रोजगार मिळवावा

Next
ठळक मुद्देकुणाल खेमणार : जिल्हा कारागृहात त्रैमासिक बैठक, जिल्हाधिकाऱ्यांकडून कारागृहाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बांबू हस्तकला प्रशिक्षण योग्य प्रकार आत्मसात करुन कारागृहातून सुटल्यानंतर बीआरटीसीमार्फत रोजगार प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना केले.
जिल्हा कारागृहात अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या व बीआरटीसीचे संचालक राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून कारागृहात सुरु असलेल्या बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कुणाल खेमणार तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अंजली घोटेकर, मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही. एस. खोत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. एस. जाधव, कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पोलीस उप-अधीक्षक मारुती इंगोले, उपविभागीय दंडाधिकारी मनोहर गव्हाड, कार्यकारी अभीयंता एम. एम. जयस्वाल, चंद्रपूर सामान्य रुग्नालयाचे प्रतिनीधी डॉ. जी. एम. मेश्राम, महिला बाल कल्याण विभागाचे जिल्हा परीविक्षा अधिकारी रमेश दडमल, परीविक्षाधिन अधिकारी बोरीकर, कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पडगिलवार, अजय चांदेकर, तुरुंग शिक्षक ललित मुंडे आदी उपस्थित होते.
यावेळी कारागृहाच्या वतीने जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांचा डॉ. भाईदास ढोले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी संपूर्ण कारागृहाची पाहणी केली. दरम्यान बंदीबांधवांनी बांबू हस्तकलेपासून तयार केलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकाºयांना भेट दिले.
तद्नंतर उपस्थित विविध शासकीय कार्यालयाच्या अधिकाºयांचा जिल्हाधिकाºयांनी आढावा बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये बंदी सुधारणेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलण्यावर जिल्हाधिकारी यांनी भर दिला. तसेच बंदी हे चार भिंतीच्या आत राहत असल्याने त्यांना प्राधान्याने आरोग्य सेवा, आहार, शिक्षण, मुलभूत सोई-सुविधा, कायदेविषयक सहाय, नियमित न्यायालय पेशी आदीबाबत तातडीने व उचित कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश शासकीय विभागांना दिले.
यावेळी बीआरटीसी, हॅन्डीक्राफ्ट सुपरवायजर योगीता साठवणे, हॅन्डीक्राफ्ट सुपरवायजर किशोर गायकवाड व सुरेश चुग आदी उपस्थित होते. उपस्थिताचे आभार कारागृह अधीक्षक डॉ. ढोले यांनी मानले. यावेळी कारागृहातील सर्व कर्मचारी व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Find employment by acquiring craftsmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.