सत्यासाठी निर्भयपणे प्रश्न विचारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:45 PM2018-09-18T22:45:04+5:302018-09-18T22:45:33+5:30

समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली विचारशक्ती जागृत ठेवून प्रश्न विचारण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मनुष्याला जेव्हा एखाद्या घटनेचा कार्यकारण भाव माहित नव्हता. तेव्हा कोणतीतरी दैवी शक्ती आम्हाला कार्यरत ठेवते, असा समज होता.

Fearlessly ask questions for the truth | सत्यासाठी निर्भयपणे प्रश्न विचारा

सत्यासाठी निर्भयपणे प्रश्न विचारा

Next
ठळक मुद्देमुक्ता दाभोलकर : विविध क्षेत्रातील नागरिकांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली विचारशक्ती जागृत ठेवून प्रश्न विचारण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मनुष्याला जेव्हा एखाद्या घटनेचा कार्यकारण भाव माहित नव्हता. तेव्हा कोणतीतरी दैवी शक्ती आम्हाला कार्यरत ठेवते, असा समज होता. परंतु विज्ञानाच्या प्रगतीनंतरही योग्य कार्यकारण भाव शोधून बुद्धीला पटेपर्यंत उत्तर मिळविणे हेच खरे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सत्यासाठी निर्भयपणे प्रश्न विचारणारे व्हा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. मुक्ता नरेंद्र दाभोलकर यांनी केले.
राजुरा मुक्तीदिन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
उद्घाटन पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांचे हस्ते झाले. मंचावर माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम अडानिया, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, सभापती हरीदास बोरकुटे, डॉ. सुरेश उपगल्लावार,आर्शिया जुही, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अरूण धोटे, रंभा गोठी, रमेश नळे, प्राचार्य संभाजी वारकड, प्राचार्य अनिल ठाकुरवार, प्राचार्य दौलत भोंगळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
 

Web Title: Fearlessly ask questions for the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.