सौर कृषिपंपांमुळे शेतकरी झाले स्वावलंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:41 PM2018-11-16T22:41:05+5:302018-11-16T22:41:50+5:30

पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.

Farmers were self-supporting due to solar farming | सौर कृषिपंपांमुळे शेतकरी झाले स्वावलंबी

सौर कृषिपंपांमुळे शेतकरी झाले स्वावलंबी

googlenewsNext
ठळक मुद्दे१०२ शेतकऱ्यांना कृषिपंप : ७१ शेतकºयांना सौरपंपाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.
केंद्र शासनाने राज्याकरिता केवळ सात हजार ५४० सौर ऊर्जापंपाचे उद्दिष्ट निश्चित केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राध्यान देण्यात आले. पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, वनविभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राअभावी विज पंप बसवू न शकणारे शेतकरी, महावितरणकडे पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकीही ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे नजजिकच्या काळात वीज पुरवठा शक्य नाही, अशा शेतकºयांच्या शेतात सौर कृषीपंप लावल्या जाते. शेत जमिनीचे क्षेत्र पाच एकर पेक्षा अधिक असल्यास योजनेचा लाभ घेता येत नाही. महावितरणच्या सहाय्याने जिल्ह्यामध्ये १३५ पंपाकरिता २०२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यातील १७३ अर्जाना मंजुरी देऊन डिमांड भरलेल्या १०२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाचा लाभ देण्यात आला. हे शेतकरी आता पिकांना पाणी देण्यासाठी स्वावलंबी झाले आहेत. सौर कृषिपंपामुळे उत्पन्नाची हमी मिळाली असून अतिदुर्गम भागातील शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी नगदी पीक घेऊ लागले आहेत.
योजनेची व्याप्ती वाढवावी
दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे. मात्र या योजनेबाबत अद्यापही अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. संबंधित विभागाकडून याबाबत पाहिजे तसा प्रचार-प्रसार करीत जनजागृती करण्यात आलेली नाही. आता कृषी विभागाने याबाबत विशेष पाऊल उचलून योजनेची व्याप्ती वाढवावी.

Web Title: Farmers were self-supporting due to solar farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.