पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:04 AM2019-05-13T00:04:13+5:302019-05-13T00:05:16+5:30

जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे पाठ फिरवू लागला आहे. वारंवार घडणाºया वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही.

 Farmers' trend to traditional crops | पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

Next
ठळक मुद्देपिकांचे नुकसान : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे पाठ फिरवू लागला आहे. वारंवार घडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी पुन्हा एकदा पारंपारिक पद्धतीच्या धान पिकाकडे वळत आहे.
जिल्ह्यात धान उत्पादक शेतकºयांनी नगदी पिकाकडे वळून आपला उदरनिर्वाह करावा असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो. परंतु वन्यप्राण्यांच्या वाढत्या समस्या, खताचे वाढते भाव यावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव पुन्हा एकदा पारंपारिक धान शेतीचा पर्याय निवडावा लागत आहे.
शेतात वाढत्या रानडुकरांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात अन्य पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वळत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मात्र विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने तसेच शासनाकडून योग्य मोबदलाही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडील कल कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सस्यांकडे विशेष लक्ष देवून त्यांना विविध पिकांकडे वळण्याचा सल्ला द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

वन्यप्राण्यांचा वाढता अधिवा
धान, भाजीपाला, मिरची यासारख्या पिकांमुळे वन्यप्राण्यांचा शेतातील वावर वाढतो. परिणामी हरिण, रानडुकर, निलगाय, माकडांचे कळप हिरवा चारा व पाण्यासाठी सुरक्षीत जागा यामुळे अशा पिकांकडे आपला मोर्चा वळवितात. तसेच रात्रीच्या वेळी अस्वल, ससे, रानडुकर तसेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शिकारीसाठी बिबट व लांडगे यांचाही वावर वाढतो.त्यामुळेचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी व शेतमजुरांवर वन्यप्राण्याचा हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.

तुटपुंजी मदत
गेल्या काही वर्षांत पावसाची सततची अनियमितता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकºयांची धानपिकासह मिरची व अन्य पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. शासनाकडून हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती करणे कठीण होत आहे. शासनाकडून तुटपूंजी मदत दिली जाते. त्यामुळे अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांसाठी परवडणारा नाही. तर पिकांचे संरक्षण आणि उपाययोजनाही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Web Title:  Farmers' trend to traditional crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी