चंद्रपूरात अस्थिमज्जा नोंदणी व आधुनिक रक्त तपासणी केंद्र होणार स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 04:15 PM2019-06-14T16:15:18+5:302019-06-14T16:15:48+5:30

चंद्रपूर जिल्ह्यतील नागरिकांना दर्जायुक्त आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी याआधी ही अनेक यशस्वी प्रयत्न केले.

Establishment of Chandrayaan Orthopedic Medicines and Modern Blood Testing Center | चंद्रपूरात अस्थिमज्जा नोंदणी व आधुनिक रक्त तपासणी केंद्र होणार स्थापन

चंद्रपूरात अस्थिमज्जा नोंदणी व आधुनिक रक्त तपासणी केंद्र होणार स्थापन

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपूरात शासकीय वैद्यकीय महाविलयाच्या माध्यमातून गरीब रूग्णांना उत्तम व अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सदैव प्रयत्नरत असणारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता अस्थिमज्जा नोंदणी केंद्र (बोन मॅरो रजीस्ट्रेशन सेंटर) तसेच  नॅट आधुनिक रक्त तपासणी केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांची नवी दिल्ली येथे भेट घेत सकारात्मक चर्चा केली.

न्युक्लीक ऍसिड टेस्टींग (नॅट) च्या माध्यमातून एच.आय.व्ही., एच.बी.व्ही., एच.सी.व्ही. यांसारख्या अनेक गंभीर आजारांची रक्त तपासणी व दर्जेदार रोगनिदानाचे काम होणार आहे. दैनंदिन रक्त तपासणीसाठी सर्वसाधारण पॅथालाॅजी मध्ये महिणाभराचा कालावधी लागत असेल तर नॅट मधुन हीच तपासणी 3 ते 5 दिवसात शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील रूग्णांचे दर्जेदार रोगनिदान होण्यास मदत होईल. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिमज्जा नोंदणी केंद्रामुळे (बोन मॅरो रजीस्ट्रेषन सेंटर) कॅन्सरग्रस्तांसह थॅलेसेमिया, सिकलसेल अनेमिया, लिम्फोमा यांसारख्या रक्तदोष असलेल्या रूग्णांना चंद्रपूर येथेच नोंदणी सुविधा उपलब्ध होवुन उपचारासाठी लागणार दिर्घकाळाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यतील नागरिकांना दर्जायुक्त आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी याआधी ही अनेक यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे बऱ्याच सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाल्या आहे. तसेच अस्थिमज्जा नोंदणी केंद्र व नुक्लीक अॅसीड टेस्टींग (नॅट) केंद्रामुळे जिल्हातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विष्वास माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Establishment of Chandrayaan Orthopedic Medicines and Modern Blood Testing Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.