चौकातील अतिक्रमण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:40 AM2018-02-19T00:40:30+5:302018-02-19T00:40:46+5:30

शहरातील रस्ते आधीतच अरुंद आहेत. दोन वाहने आली तरी नागरिकांचा कोंडमारा होतो. येथील टिपू सुलतान चौक अतिशय वर्दळीचा असून मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांची डोकेदु:खी वाढली.

The encroachment on the square is dangerous | चौकातील अतिक्रमण धोकादायक

चौकातील अतिक्रमण धोकादायक

googlenewsNext
ठळक मुद्देअपघाताच्या घटना वाढल्या : कारवाई कधी होणार ?

मनोज गोरे ।
ऑनलाईन लोकमत
कोरपना: शहरातील रस्ते आधीतच अरुंद आहेत. दोन वाहने आली तरी नागरिकांचा कोंडमारा होतो. येथील टिपू सुलतान चौक अतिशय वर्दळीचा असून मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांची डोकेदु:खी वाढली. हा चौक जणू मृत्यूचाच सापळा झाल्याचे संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे़
कोरपना शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शाळा, महाविद्यालय, आरोग्यकेंद्र, औद्योगिक संस्थामुळे वाहनाची संख्या वाढली. जिल्हा व अन्य तालुक्यांशी संपर्क वाढल्याने दिवसभरात शेकडो वाहने शहरात येतात. यवतमाळ, आदिलाबाद व चंद्रपूर येथून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची संख्या चिंताजनक झाली आहे. शहरातील मुख्य वर्दळतीचे ठिकाण असलेल्या टिपू सुलतान चौकातून बरीच वाहने वळसा घेतात. याच मार्गावर काही मोठ्या दुकानदारांनी दुकाने थाटली. शिवाय दुकानांसमोरील सरकारी जागा अन्य लहान व्यवसायिकांना देवून खोऱ्याने पैसे मिळवित आहे. फळ विक्रेते, पानठेले, खासगी प्रवासी वाहतूक आणि अन्य किरकोळ व्यवसायिकांना नाईलाजास्तव या चौकातूनच कारभार हाकावा लागत आहेत. त्यामुळे चौकात दिवसभरात प्रचंड गर्दी असते. पादचाºयांना येथून वाट काढताना जिवाची कसरत होते़ हा सर्व प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासनातील संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणांकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केले. पोलीस प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला नाही. परिणामी, या चौकात दिवसेंदिवस अपघात होत आहेत.
पोलीस प्रशासनाने या चौकात शिपाईची नियुक्ती केली नाही. वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. टिपू सुलतान चौकात चारही बाजूने लहानमोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. हे अतिक्रमण हटविण्याचे धाडस अजूनही अद्याप कोणी केले नाही. याला कारण काय, असा सवाल नागरिक विचारीत आहे. आठवडी बाजारात दुकाने लावण्यासाठी बरीच मोठी जागा आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून विकासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. केवळ राजकीय हिशेब पुढे ठेवून लोकप्रतिनिधी गप्प बसत असल्याने या चौकातील अतिक्रमण सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरले आहे.
शहराच्या विकासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे नागरिक सुविधा पूर्ण करताना दीर्घकालीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. यामध्ये शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते़ मात्र आजपर्यंतचा अनूभव लक्षात घेता यासाठी कोणत्याच हालचाली सुरु नसल्याने कोरपना येथील समस्या वाढतच आहेत़
शहरातील अतिक्रमणाला अभय कुणाचे ?
कोरपना शहरातील टिपू सुलतान चौकासोबतच अन्य मार्गांवरही मोठ्या प्रत्तमणात अतिक्रमण झाले आहे़ हे अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. बाजारपेठ, शहरातील लहान दुकाने आणि सार्वजनिक संस्थाना चांगली शिस्त लागू शकते. परंतु लोकप्रतिनिधींनी हा विषय अद्याप गांभिर्याने घेतलाच नाही. तर दुसरीकडे अतिक्रमणाला अभय दिले जात आहे.

Web Title: The encroachment on the square is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.