बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:04 PM2018-12-14T23:04:11+5:302018-12-14T23:04:27+5:30

मागील चार वर्षात अनेक शहरात कोटीचे काम केले आहे. येत्या वर्षात बेरोजगारांसाठी साखर कारखाना, सिंदेवाहीलाच कृषी विद्यापीठ शेतकऱ्यासाठी सिंचनाची सुविधा, तसेच गोसेखुर्द पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत, असा विश्वास आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Employment will be available for the unemployed | बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध होणार

बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध होणार

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : सिंदेवाहीत विविध साहित्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : मागील चार वर्षात अनेक शहरात कोटीचे काम केले आहे. येत्या वर्षात बेरोजगारांसाठी साखर कारखाना, सिंदेवाहीलाच कृषी विद्यापीठ शेतकऱ्यासाठी सिंचनाची सुविधा, तसेच गोसेखुर्द पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत, असा विश्वास आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
सिंदेवाही येथील सोमश्वर महाराज पटांगणावर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सत्कारा सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर किरण वडेट्टीवार, काँग्रेस कमिटीच्या प्रदेश समन्वयक शिवानी वडेट्टीवार, गडचिरोली जि. प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, जि. प. गटनेता सतिश वारजुकर, माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षा रिता उराडे, अ‍ॅड. रजनी हजारे, नंदा अल्लूरवार, युवा नेते डॉ. नितीन कोडवते, जेष्ठ काँग्रेस नेते रघुनाथ शेंडे उपस्थित होते. यावेळी विधवा गरजू महिलांना शिलाई मशीन अपंगांना तीनचाकी सायकल वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक यावेळी काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, संचालन डॉ. अमर धम्मानी, आभार नगरसेवक युनूस शेख यांनी मानले. यावेळी कॉंग्रेस जेष्ठ अरूण कोलते, शहाध्यक्ष राहुल पटेल, हरि बारेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Employment will be available for the unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.