पाणावले डोळे कोरड्या आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:19 PM2019-07-17T23:19:07+5:302019-07-17T23:19:22+5:30

जुुलेै महिन्याच्या प्रारंभी पाऊस येऊन दुसऱ्याच आठवड्यात गायब झाला. आता कडाक्याची ऊन्ह तापू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हे करपण्याच्या मार्गावर आहे. पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत पुन्हा आटू लागले आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Dried eyes dry up in the sky | पाणावले डोळे कोरड्या आकाशाकडे

पाणावले डोळे कोरड्या आकाशाकडे

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा : पºहे जगवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुुलेै महिन्याच्या प्रारंभी पाऊस येऊन दुसऱ्याच आठवड्यात गायब झाला. आता कडाक्याची ऊन्ह तापू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हे करपण्याच्या मार्गावर आहे. पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत पुन्हा आटू लागले आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात आवते पऱ्हे भरण्याचे काम जवळजवळ आटोपले असले तरी पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता रोवणीसाठी व सुकत असलेले पऱ्हे जगविण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आहेत.
नागभीड तालुक्यात जवळजवळ ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. साधारणत: जूनच्या २० तारखेनंतर आणि जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात .पऱ्हे १५ ते २० दिवसाचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पºहांची रोवणी करण्यात येते.
यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकºयांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले असते. मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभीच हलक्या स्वरूपात सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने परहयांचा हंगाम थोडा लांबला. पण यावरही मात करून हा हंगाम पूर्ण केला. ज्या शेतकऱ्यांनी अगदी सुरूवातीला पऱ्हे टाकले, त्या शेतकऱ्यांचे पऱ्हे रोवणीयोग्य झाले आहेत. पऱ्हे रोवणीयोग्य झाले असले तरी पावसाने मात्र गेल्या आठवडयापासून दडी मारल्याने रोवण्या तर लटकल्याच पण काही ठिकाणी टाकलेले पऱ्हे सुकायला सुरूवात झाली आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या समोर मोठे संकट निर्माण होऊ शकते व त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
नागभीड, सिंदेवाही, मूल, तळोधी, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, चिमूर या तालुक्यात धान पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. याच एका पिकावर तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. हे पीक गेले तर संपूर्ण तालुक्याचीच अर्थव्यवस्था कोलमडून पडते. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना याच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकरी शेती करण्याच्या मनस्थितीत नाही. पण अन्य कोणतेही काम नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव शेती करावी लागत आहे.
पावसाअभावी पिकाला वाळवी
कोरपना - दोन ते तीनदा झालेला समाधानकारक पाऊस वगळता पावसाचे पाहिजे तसे आगमन झाले नसल्याने कोरपना तालुक्यातील अनेक शेतातील शेत पिकांना वाळवी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. काही ठिकाणी दुबार, तिबार पेरणी यंदा शेतकऱ्यांना करावी लागली. पेरणीनंतर पिकाची उगवण झाली. मात्र बºयोच दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत असल्याने पिके धोक्यात आली आहे. समाधानकारक पावसाअभावी तालुक्यातील अनेक तलाव, नाल्यातही पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात जलसंकटाची चिंता नागरिकांना सतावत आहे. जमीन मोठया प्रमाणात तापली असल्याने त्याच्या खोलवरपर्यंत आजही पाणी रुजले गेले नाही. परिणामी अनेक कूपनलिका, विहिरी कोरडया पडल्या असल्याचे चित्र आहे. पावसाच्याच ऋतूत पावसाच्या आगमनात खंड पडत असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. आधीच शेतकरी वर्ग दुबार, तिबार पेरणीमुळे आर्थिक संकटात आला आहे. त्यातच पाऊसही अत्यल्प पडत असल्याने पिके कशी उभी राहील, अशी चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे.
टँकरने पिकांना पाणी
ब्रम्हपुरी : वैनगंगेच्या कुशीत सामावलेला बळीराजा भविष्याची स्वप्न उराशी बाळगून पावसाची वाट पाहत आहे. करपलेली पिके आणि यातून नशिबी येणारे दारिद्रय यामुळे शेतकºयांचे अख्खे आयुष्य जमिनीला पडलेल्या भेगांप्रमाणे झाले आहे. बळीराजाने अत्यंत घाईगडबडीत धानाचे पऱ्हे टाकले तर काही ठिकाणी आवते धान टाकले. परंतु पावसाने दडी मारल्याने धान पऱ्हे करपून गेली आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक शेतकरी पºह्यांना टँकरने पाणी पुरवठा करीत आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या आशेने ब्रह्मपुरी तालुक्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण वरुणराजने दगाबाजी केली. भर पावसाळ्यात कडक उन्ह पडत असल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे आणि पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. निघालेले अंकुर खाली माना टाकत आहेत तर काही बियाणे मातीत मातीमोल होऊन गेले आहेत.
ग्रामीण जलस्रोत पुन्हा आटायला लागले
मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील अकराही सिंचन प्रकल्पासह नदी, नाले, तलाव, बोडी यातील जलसाठा आटला होता. अनेक ठिकाणी हे जलस्रोत कोरडे पडले होते. दरम्यान उशिरा का होईना, जुलै महिन्याच्या प्रारंभी सतत पाऊस पडत असल्याने या जलस्रोतात पाणी जमा होऊ लागले. हा पाऊस सतत होत असला तरी दमदार स्वरुपाचा नव्हता. शिवाय जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली. ऐन जुलै महिन्यातच कडाक्याचे ऊन्ह पडत असल्याने ग्रामीण भागातील हे जलस्रोत पुन्हा आटायला लागले आहेत.

Web Title: Dried eyes dry up in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.