डीजे व्यावसायिकांचा जिल्हा कचेरीवर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:37 AM2017-07-23T00:37:30+5:302017-07-23T00:37:30+5:30

शासनाच्या नियमानुसार ७५ डेसीबल आवाजापर्यंत डीजे वाजविण्याची परवानगी असतानाही चंद्रपूर जिल्ह्याच्या नव्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी डीजे वाजवण्यावर सरसकट बंदी घातली आहे.

DJ Professionals' District Workshop Mute Front | डीजे व्यावसायिकांचा जिल्हा कचेरीवर मूक मोर्चा

डीजे व्यावसायिकांचा जिल्हा कचेरीवर मूक मोर्चा

Next

उपासमारीची पाळी : पोलीस अधीक्षकांच्या बंदी निर्णयाचा विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाच्या नियमानुसार ७५ डेसीबल आवाजापर्यंत डीजे वाजविण्याची परवानगी असतानाही चंद्रपूर जिल्ह्याच्या नव्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी डीजे वाजवण्यावर सरसकट बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३५० डीजे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हाथावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ३५० डीजे व्यावसायिक आहेत. सर्व व्यावसायिकांनी बँकेतून तसेच नातेवाईकांकडून कर्ज घेऊन डीजेचा व्यवसाय सुरु केला. मात्र पोलीस विभागाकडून डीजे वाजण्यावर सरसकट बंदी घातली. त्यामुळे डीजे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच कर्ज फेडण्यास अडचण निर्माण झाली आहे.
३ एप्रिलला पोलीस विभागाने बैठक घेऊन लग्न समारंभ तसेच मिरवणुकीत इतर वाद्यांना बंदी घातली. त्यामुळे मागील चार महिन्यापासून डीजे व्यवसाय बंद आहे. त्यामुळे डीजे व्यावसायिक व त्यावर काम करणाऱ्यावर मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हाथावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
सदर निवेदनात डीजे व्यावसायिकांवरिल सर्व कर्ज माफ करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष उमेश लांडगे, सचिव अभिजीत बेले, कोषाध्यक्ष हर्षद साखरकर तसेच संस्थेच पदाधिकारी व जिल्ह्यातील डीजे व्यावसायिक उपस्थित होते.

Web Title: DJ Professionals' District Workshop Mute Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.