काँग्रेसचे जिल्हाभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:10 PM2017-09-18T23:10:25+5:302017-09-18T23:10:52+5:30

राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले.

The district-wide movement of the Congress | काँग्रेसचे जिल्हाभर आंदोलन

काँग्रेसचे जिल्हाभर आंदोलन

Next
ठळक मुद्देकेंद्र व राज्य सरकारचा निषेध : पुष्पगुच्छ देऊन नागरिकांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
बल्लारपुरात मोर्चा
शहर युवक काँग्रेस कमिटीतर्फे पेट्रोल, डिझेल, गॅस व वीज दरवाढीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दिलीप माकोडे, नगरसेवक भास्कर माकोडे, युवक काँग्रेसचे गट नेता सचिन जाधव, कमलेश माकोडे, अमित पाझरे, निशांत आत्राम, अ‍ॅड. पवन मेश्राम, चंदन तिलोकाणी, दिपक चव्हाण, सुनील युवने, धर्मेंद्र यादव, राकेश लांजेवार, फिरोज सिद्दीकी, सुनील नगराळे आदी सहभागी झाले होते.
गोंडपिपरीत काँग्रेसकडून धरणे
येथील तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने राज्य शासनाविरोधात धरणे देण्यात आले. वाढती महागाईमुळे जनता होरपळत असून गोरगरीबांची जाण न ठेवणाºया शासनाचा निषेध या ठिकाणी नोंदविण्यात आला. यात तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, कृउबा सभापती सुरेश चौधरी, देविदास सातपुते व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाºयांनी शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध गांधीगिरी करून स्थानिक व्यवसायीक नागरिक यांना पुष्पगुच्छ देऊन शासनाच्या अन्यायकारक धोरणापासून सावध राहण्याचे आवाहन करत पत्रके वाटून जनजागृती केली. यावेळी रफीक शेख, शैलेश बैस, राजीव चंदेल, राजू पावडे, बी.सी. बॅनर्जी यांच्यासह काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण भागातही हे आंदोलन झाले.
जिवतीत धरणे आंदोलन
जिवती तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य गोदरू जुमनाके, निशिकांत सोनकांबळे, मारोती बेलारे, अश्फाक शेख, इस्माईल शेख आदी कार्यकर्ते सहभागी होते.
सावली तालुक्यात काँग्रेसचे निवेदन
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस व विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तालुका शाखा सावली यांच्यातर्फे महागाई विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवित सावलीच्या तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. सावली तालुका महासचिव उत्तम गेडाम यांच्या नेतृत्व सावलीच्या तहसीलदाराकडे निवेदन देण्यात आले. यावेळी बबन लोनबले, अरुण संदोकार, प्रेमप्रकाश बोरकर, विनायक गेडाम, आबाजी आवळे, अशोक वेटे, संजय गेडाम, प्रदीप सेमस्कार, विजय गोंगले, चंदू दुधे, ईश्वरदास दुधे यांची उपस्थिती होती.
ब्रह्मपुरीत काँग्रेसचे निवेदन
भाजपा सरकारने तीन वर्षांच्या काळात पेट्रोलची ६० रुपयांवरुन ८० रुपयांवर भाववाढ केली. तसेच डिझेल, गॅसवर वाढ व वीज बिलात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहिसलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विजय तुमाने, काशिनाथ खरकाटे, राकेश कºहाडे, गणी खान, नारायण बोकडे, प्रभाकर सेलोकर, संजय हटवार, बी.आर. पाटील, इनायत खा पठान, एच.एन. सिंग व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The district-wide movement of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.