धोटे बंधूंच्या अटकेच्या निषेधार्थ राजुऱ्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:30 AM2019-05-25T00:30:18+5:302019-05-25T00:31:03+5:30

माजी आमदार सुभाष धोटे व नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना विनयभंग प्रकरणात पीडितेला तक्रार करण्यापासून अडथळा केल्याच्या खोटया आरोपाखाली अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकराच्या निषेधार्थ आज शुक्रवारी राजुºयात कॉँग्रेस कमेटीच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला.

Dissolves in the Rajkuram, in protest against the arrest of the brothers | धोटे बंधूंच्या अटकेच्या निषेधार्थ राजुऱ्यात कडकडीत बंद

धोटे बंधूंच्या अटकेच्या निषेधार्थ राजुऱ्यात कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देस्वयंस्फूर्त : खोटी तक्रार दाखल केल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : माजी आमदार सुभाष धोटे व नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना विनयभंग प्रकरणात पीडितेला तक्रार करण्यापासून अडथळा केल्याच्या खोटया आरोपाखाली अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकराच्या निषेधार्थ आज शुक्रवारी राजुºयात कॉँग्रेस कमेटीच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला. याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली व कडकडीत बंद पाळण्यात आला.
राजुरा विधानसभा आणि राजुरा शहराच्या एकूणच विकासात महत्त्वाचे योगदान देणाºया तथा येथील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया धोटे बंधूंच्या विरोधात राजकीय सुडबुध्दीने वारंवार त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आह. याविरुद्ध आज राजुºयात शंभर टक्के बंद पाळण्यात आला. याप्रकरणात धोटे बंधूंना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणात नाटयमय वळण आले असून पीड़ित मुलीने चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी ही खोटी तक्रार करायला लावल्याचे सांगितले. त्यामुळे याचा काँग्रेस कमिटीने निषेध केला.

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर व राजुराचे पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांनी राजकीय दबावाखाली व सुडाची भावना ठेवून कोणतीही चौकशी न करता धोटे बंधूंवर गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली असून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Dissolves in the Rajkuram, in protest against the arrest of the brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.